शरद पवारांनी अजितदादांना शाबासकीची थाप देतानाच होणारा गोड त्रासही सांगितला!

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जाहीर कौतुक केले
Sharad Pawar-Ajit Pawar
Sharad Pawar-Ajit PawarSarkarnama

बारामती : अजित म्हणजे दर्जेदार विकास हे सूत्र आता राज्याला माहिती झाले आहे. कोणतेही काम हातात घेतले की ते उत्तमपणे तडीला न्यायचा अजितचा स्वभाव आहे. पण, मला अनेकदा त्याचा त्रासही होतो, असे जाहीर कौतुक करत ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज (ता. १९ फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना शाबासकीची थाप दिली. ही थाप देत असतानाच त्यांनी एका होणाऱ्या गोड त्रासाचाही आवर्जून उल्लेख केला. (Sharad Pawar praised Deputy Chief Minister Ajit Pawar)

बारामती तालुका पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात पवार यांनी अजित पवार यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना शाबासकीची थापही दिली.

Sharad Pawar-Ajit Pawar
बारामतीला तीन हजार गेले की दीड हजार इंदापूरला येतात : मुंडेंनी उलगडले भरणेंच्या निधीचे गुपित

आपल्या भाषणात शरद पवार यांनी अजित पवार यांच्या कार्यशैलीचे मोकळेपणाने कौतुक केले. ते म्हणाले, मी राज्यात कोठेही गेलो, तरी बारामतीसारख्या वास्तू हव्यात असा आग्रह माझ्याकडे धरला जातो. मध्यंतरी मला काही वकील भेटले होते, ते म्हणाले की, बारामतीसारखे न्यायालय हवे, विश्रामगृहाची मागणी झाली तीही बारामतीसारखीच. बारामतीचे मेडीकल कॉलेज पाहिल्यानंतर राज्यातील लोक आता अशीच वास्तू आम्हालाही हवी, असे म्हणतात. मेडीकल कॉलेज एका वर्षात देशातील एक उत्तम कॉलेज म्हणून नावारुपाला येईल, असा विश्वास व्यक्त करत ‘बारामतीसारख्याच वास्तू हव्यात’ असा आग्रह लोक धरतात, असा तो गोड त्रास असतो,’ असा उल्लेखही शरद पवार यांनी या वेळी हसत हसत केला.

Sharad Pawar-Ajit Pawar
तत्कालीन मंत्री स्वतःला परळीच्या मालक समजायच्या : धनंजय मुंडेंचा पंकजांवर निशाणा

अजित पवार यांनी काम हातात घेतल्यानंतर ते नेटके, सुबक व स्वच्छ असावे, असा त्यांचा आग्रह असतो. त्यांच्या प्रयत्नांमुळे बारामतीचा चेहरामोहरा बदलला. तसेच, या भागातील लोकांचे राहणीमानही उंचावले आहे, याचे मला समाधान वाटते, अशा शब्दांत पवार यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या कामाची प्रशंसा केली. कोणतेही काम करताना ते उत्तमच असावे, हा त्यांचा आग्रह असतो आणि त्याने आज बारामतीचे रुप बदलले दिसते, असेही त्यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com