शरद पवार पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत

सर्वांनी एकत्र येऊन भाजपला पर्याय निर्माण केला पाहिजे, अशी पवार साहेबांची भूमिका आहे : नवाब मलिक
sharad pawar
sharad pawarsarkarnama

मुंबई : ‘‘मला नेतृत्व नको, असं ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी आधीच स्पष्ट केले आहे. सर्वानी एकत्र येऊन पर्याय निर्माण केला पाहिजे, अशी पवार यांची भूमिका आहे. त्यामुळे शरद पवार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत,’’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज (ता. ११ जानेवारी) सायंकाळी जाहीर केले. (Sharad Pawar is not a candidate for the post of Prime Minister : Nawab Malik)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीची बैठक मुंबईत झाली. या बैठकीत महामंडळ, महाराष्ट्रातील पक्षाचे संघटन आणि इतर राज्यातील निवडणुका या संदर्भात चर्चा झाली. त्यानंतर राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री मलिक यांनी ही माहिती दिली.

sharad pawar
भाजपला आणखी एक धक्का : माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार!

ते म्हणाले की, सर्वांनी एकत्र येऊन भाजपला पर्याय निर्माण केला पाहिजे, अशी पवार साहेबांची भूमिका आहे. नेतृत्वासंदर्भातील भूमिका त्यांनी अगोदरच स्पष्ट केली आहे. त्यामुळे शरद पवार हे पंतप्रधानपदाचे असणार नाहीत. पण, पवारसाहेबांवर सर्वांचा विश्वास आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांबाबत केलेल्या विधानाबाबत त्यांनी सांगितले की, ज्योतिष शास्त्र आमच्याकडे नाही. पोपटच्या माध्यमातून चिठ्ठी काढणे, भविष्यवाणी करणे, हे काम अमित शहा आणि नरेंद्र मोदी करत होते.

sharad pawar
राष्ट्रवादीत प्रवेश करताच काँग्रेसचे नेते म्हणाले ‘यूपीएचे नेतृत्व शरद पवारांनी करावे’

यूपीमध्ये समाजवादी पक्षासोबत आमची आघाडी निश्चित झालेली आहे. याबाबतची माहिती खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. समाजवादी पक्षासोबत आम्ही जाणार, ही आमची सहा महिन्यांपासूनची भूमिका होती. त्यानुसार आमची बोलणी सुरू होती. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि प्रफुल पटेल यांच्यामध्ये बोलणे झाला आहे. आम्हाला ज्या जागा अपेक्षित होत्या, त्या आमच्यासाठी ते सोडत आहेत, त्यामुळे आम्ही यूपीत समाजवादी पक्षासोबत जात आहोत. त्या ठिकाणी सध्या जुळवाजुळवीचे काम सुरू आहे, असेही मलिक यांनी स्पष्ट केले.

sharad pawar
काँग्रेसच्या माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश

मलिक म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये गेली पाच वर्षे भाजपचा कारभार राहिलाय. मागासवर्ग, गरीब, मजूर, महिला यांच्यावर अन्याय झाला आहे. लखिमपूर खिरीची घटना, उन्नाव बलात्कार प्रकरण, यानंतरही भाजपला परिस्थिती बदलली, असे अजूनही वाटते. अन्याय आणि अत्याचार झालेल्यांची वेगळी लाट सध्या उत्तर प्रदेशमध्ये आहे. धर्माच्या नावावर लोक आमच्यासोबत आहे, असे भाजपचे लोक भासवत आहे. मात्र, १९९३ मध्ये मंदिर-मशीदच्या नावाने जातीय दंगली झाल्या, त्यावेळी भाजपला पराभव स्वीकारावा लागला होता. गेली पाच वर्ष जनतेवर केलेला अन्याय, हे सगळं या सरकारच्या सध्या विरोधात आहे.

sharad pawar
राष्ट्रवादी काँग्रेस तीन राज्यांत निवडणूक लढवणार : शरद पवारांची घोषणा

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारापणाबाबत भाजपचे लोक टीका करत आहेत, ते योग्य नाही, असेही त्यांनी राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in