एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत पवारांनी उद्धव ठाकरेंना चार वेळा अलर्ट केले होते....

शिंदे यांच्यावरील अतिविश्वास उद्धव ठाकरे यांच्या अंगलट आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आता रंगू लागली आहे.
Sharad Pawar-Uddhav Thackeray- Eknath Shinde
Sharad Pawar-Uddhav Thackeray- Eknath ShindeSarkarnama

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad Pawar) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाची माहिती चार वेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिली होती, अशी माहिती पुढे आले आहे. तसेच, राज्याच्या गृहविभागानेही त्यांना शिंदे यांच्या बंडाबाबत अलर्ट केले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे यांच्यावरील अतिविश्वास उद्धव ठाकरे यांच्या अंगलट आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आता रंगू लागली आहे. (Sharad Pawar had informed Uddhav Thackeray about Eknath Shinde's rebellion four times...)

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या भिन्न विचाराच्या तीन पक्षांचे सरकार महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्तेवर आले होते. मात्र, अनेकांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्याने सरकार स्थापनेपासूनच कुरबुरी सुरू झाल्या होत्या. विशेषतः शिवसेनेच्या नेत्यांकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात बोलण्यास सुरुवात झाली होती. भाजपन नेत्यांकडून हे सरकार आम्ही पाडणार नाही, तर ते अंतर्विरोधानेच पडेल, असे ठामपणे सांगितले जात आहे. विचारसरणामुळे काँग्रेस या आघाडीतून बाहेर पडेल, अशी अनेकांची धारणा होती. मात्र, झाले उलटेच काँग्रेस-राष्ट्रवादी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. मात्र, त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी त्यांना उघडपणे आव्हान दिले.

Sharad Pawar-Uddhav Thackeray- Eknath Shinde
बंडखोर एकनाथ शिंदेंच्या स्वागताला पोचले भाजपचे बडे पाच आमदार!

दरम्यान, शिवसेनेतील नंबर दोनचे मानले जाणारे नेते एकनाथ शिंदे हे आपल्याला मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने नाराज असल्याच्या बातम्या अधूनमधून यायच्या. मात्र, शिंदे हे शिवसेनेचे कट्टर नेते आणि कडवट शिवसैनिक असल्याचा दाखला दिला जायचा. मात्र, त्यांच्या गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून गुप्तपणे हालचाली सुरू होत्या, हे आता बंडानंतर उघड झाले आहे. शिंदे यांच्या बंडाची ज्येष्ठ नेते शरद पवार यांना बहुधा माहिती मिळाली असावी. ती माहिती पवार यांनी उद्धव ठाकरेंना तब्बल चार वेळा दिली असल्याचे आता पुढे आले आहे. राज्य सरकारच्या गृहविभागाकडूनही शिंदे यांच्या बंडाबाबत पाच वेळा उद्धव ठाकरेंना माहिती देण्यात आली होती. मात्र, निष्ठावंत म्हणून त्याकडे ठाकरे यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात आले.

Sharad Pawar-Uddhav Thackeray- Eknath Shinde
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघेच १ जुलै रोजी शपथ घेणार

राज्यसभा निवडणुकीच्या वेळी मात्र एकनाथ शिंदे यांच्या हालचाली उद्धव ठाकरे यांना वेगळ्या पद्धतीच्या वाटल्या होत्या. त्यामुळे खुद्द उद्धव ठाकरे यांनी स्वतः एकनाथ शिंदे यांना विचारणा केली होती. मात्र, शिंदे यांनी नेहमीप्रमाणे असे काही नाही, असे सांगून ती शक्यता फेटाळून लावली होती. मात्र, विधान परिषदेच्या मतदानानंतर शिंदे हे आपल्याबरोबर काही आमदार घेऊन सूरत गेल्यानंतरच शिवसेनेला शिंदे यांच्या बंडाची कल्पना आली. त्यानंतर विविध राजकीय घडामोडीनंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com