घसा बसलेला असूनही पवारांनी भाषण करत कार्यकर्त्यांना केले चार्ज!

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मला आणखी १० ते १५ दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर मला माझे नियमित काम सुरू करता येईल.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

शिर्डी : मुंबईतील ब्रीच कॅंडीतून थेट शिर्डीत (Shirdi) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अधिवेशनाच्या व्यासपीठावर दाखल झालेले पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी घसा बसलेला असतानाही छोटेखानी भाषण करत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. वैद्यकीय उपचारामुळे त्यांना बोलता येत नव्हते, तरीही पवारांनी मार्गदर्शन करत उपस्थित नेतेमंडळींना चार्ज करण्याचा प्रयत्न केला. (Sharad Pawar guided NCP's Activist's in Shirdi Meeting)

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पुढाकाराने शिर्डीत कालपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे शिबिर सुरू आहे. शिबिराच्या पहिल्या दिवशी पवार यांनी ऑनलाईन उपस्थिती लावून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला होता. त्यानंतर आज दुपारी थेट व्यासपीठावर विराजमान होत छोटेखानी का होईना भाषण करत पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये स्फुलिंग पेटविण्याचा प्रयत्न केला.

Sharad Pawar
शरद पवार ब्रीच कॅंडीतून थेट शिर्डीत राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दाखल

पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डीत शुक्रवारपासून (ता. ४ नोव्हेंबर) अतिशय उत्कृष्ट शिबिर सुरू आहे. शिबिरातील अनेकांची भाषणं अन्य मार्गाने ऐकण्याची संधी मुंबईत हॉस्पिटलमध्ये बसून मिळाली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. अतिशय सूत्रबद्ध, उत्तम आणि कार्यकर्ते, सहकाऱ्यांना एक प्रकारची शक्ती देणारे हे अधिवेशन शिर्डीत आयोजित केले आहे.

Sharad Pawar
आमदार बबनराव शिंदेंनी पंढरपुरात पुन्हा घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट!

जयंतरावांकडून मला शिबिराबाबत माहिती मिळत होती. शिर्डीत प्रचंड गर्दी झाली आहे. पण, राज्यातील विशेषतः युवक कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या, समाजातील लहान घटकांमध्ये काम करणारे आदिवासी, दलित, भटके विमुक्त अशी सर्वांची इच्छा शिबिराला यावं, अशी होती. पण, त्यांच्यासाठी स्वतंत्र शिबिर आयोजित करण्याचा निर्णय जयंतराव पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे. माझी खात्री आहे की, त्यांचा हाही उपक्रम यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, असा आशावादही पवार यांनी व्यक्त केला.

Sharad Pawar
पवार-शिंदे भेटीत भविष्यातील मोठं रहस्य दडलंय; ती वेगळं काहीतरी देणार : राष्ट्रवादी नेत्याचा बॉम्बगोळा

पवार म्हणाले की, मी सगळ्यांची भाषणं ऐकली असं नाही. पण, बहुतांश भाषणं ऐकण्याची संधी मिळाली. सविस्तर बोलायला आणि भाषणं करायला आज मला शक्य नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मला आणखी १० ते १५ दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर मला माझे नियमित काम सुरू करता येईल. मी खात्रीने एवढेच सांगू इच्छितो की, राष्ट्रवादी काँग्रेसचा लहान-थोर कार्यकर्ता पूर्ण ताकदीने हा पक्ष मजबूत करण्यासाठी लढत आहे, हा संदेश या शिबिरातून जाईल. स्वतःच्या ताकदीवर, हिम्मतीवर महाराष्ट्रात वेगळं परिवर्तन करण्याची हिम्मत आणि ताकद तुम्हा सर्वांमध्ये आहे. ही संधी लवकरच मिळेल, अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com