बड्या नेत्याच्या दबावामुळे कोतमिरे सोडणार ‘डीसीसी’चे प्रशासकपद? निर्णयानंतर कर्मचारी ओक्साबोक्शी रडले

‘साहेब तुम्ही थांबा, आम्ही तुमच्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटतो,’ अशी विनवणी काही कर्मचाऱ्यांनी केली.
Shailesh Kotmire-Solapur Dcc Bank
Shailesh Kotmire-Solapur Dcc BankSarkarnama

सोलापूर : सोलापूर (Solapur) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (District Bank) प्रशासक (Administrator) तथा राज्याच्या सहकार विभागाचे अप्पर निबंधक शैलेश कोतमिरे (Shailesh Kotmire) यांनी सोलापूर डीसीसीचे मोठे थकबाकीदार असलेल्या विजय आणि आर्यन शुगरची विक्री केली. आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या या बॅंकेला अच्छे दिन त्यांनी दाखविले. प्रशासक कोतमिरे यांनी आपण आता या बॅंकेत प्रशासक म्हणून राहणार नसल्याची माहिती गुरुवारी (ता. १५ सप्टेंबर) रात्री डीसीसीच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना दिली. (Shailesh Kotmire's decision to leave the post of administrator of Solapur District Bank)

प्रशासक कोतमिरे यांनी अचानक घेतलेल्या या भूमिकेमुळे जिल्हा बॅंकेचे प्रशासन कमालीचे हादरले आहे? काही कर्मचाऱ्यांनी गुरुवारी रात्री ओक्‍साबोक्‍शी रडत रडत ‘साहेब तुम्ही थांबा, आम्ही तुमच्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटतो. प्रशासक म्हणून तुम्हीच कायम राहण्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांनाही साकडे घालतो,’ अशी विनवणी केली. कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे प्रशासक कोतिमरे हेदेखील काहीसे अस्वस्थ झाले आहेत.

Shailesh Kotmire-Solapur Dcc Bank
आदित्य ठाकरेंच्या स्वागत बॅनरवर झळकले शिंदे समर्थक आणि गुन्हेगारांचे फोटो!

‘मी जिल्हा बॅंकेचे प्रशासकपद सोडावे, यासाठी माझ्यावर कोणाचाही दबाव नाही अथवा मला कोणीही सांगितले नाही. बॅंकेचे प्रशासकपद सोडावे, हा माझा स्वत:चा निर्णय आहे,’ असे प्रशासक कोतमिरे यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले. तुम्ही केलेल्या मागणीवर मी दोन दिवस विचार करतो आणि मग ठरवतो, अशी भूमिका कोतमिरे यांनी कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना सांगितल्याचे समजते.

Shailesh Kotmire-Solapur Dcc Bank
राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ पदयात्रेची व्यवस्था पाहणाऱ्या नेत्याला ईडीची नोटीस

तत्कालिन चेअरमन माजी आमदार राजन पाटील यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळ मे २०१८ मध्ये बरखास्त करण्यात आले होते. या बॅंकेवर सुरुवातीला प्रशासक म्हणून सोलापूरचे तत्कालिन जिल्हा उपनिबंधक यांना नियुक्त करण्यात आले होते. सोलापूर जिल्ह्यातील भूमिपुत्र असलेले कोतमिरे हे सहकार विभागात अप्पर निबंधक पदावर कार्यरत आहेत. आपण सहकार विभागात उच्च पदावर काम करत असताना आपल्याच जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक रसातळाला जाणे बरोबर नाही, हा विचार ठेवून अप्पर निबंधक कोतमिरे यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या प्रशासकपदाची सप्टेंबर २०१८ मध्ये सुत्रे हाती घेतली होती.

Shailesh Kotmire-Solapur Dcc Bank
मोठी बातमी : पंढरपुरातील सात मजली दर्शन मंडप पाडणार; बालाजीच्या धर्तीवर दर्शनाची सोय होणार

माजी मंत्री दिलीप सोपल यांच्याशी निगडीत असलेल्या आर्यन शुगरकडे (ता. बार्शी) डीसीसी बॅंकेची ३६० कोटी रुपये येणेबाकी होती. या कारखान्याची ६८ कोटी रुपयांना विक्री झाली आहे. बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बजरंग सोनवणे यांनी हा कारखाना विकत घेतला असून या कारखान्याकडे असलेली शेतकऱ्यांची देणी द्यायची कोणी? हा प्रश्‍न सध्या चर्चेत आला आहे. प्रशासक कोतमिरे यांनी सोलापूर डीसीसीचे प्रशासकपद सोडण्याचा निर्णय घेण्यामागे आर्यन शुगरचा काही संबंध आहे का?, बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी या प्रकरणात अधिक लक्ष घातले आहे का? या प्रश्‍नांचीही कुजबूज सध्या डीसीसीच्या वर्तुळात सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com