राष्ट्रवादीचे सात आमदार अनुपस्थित : बबनदादा, मोहिते, बनसोडे, लंके यांच्या मनात काय?

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Assembly speaker election) भाजपचे नार्वेकर विजयी
Babandada-Lanke-Mohite
Babandada-Lanke-Mohitesarkarnama

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची आज निवड झाली. या निवडणुकीत नार्वेकर यांना 164 तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना 107 मते पडली. या निवडणुकी बहुजन विकास आघाडी, मनसे आणि अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले.

विधानसभेचे 288 सदस्य असताना काही जण तटस्थ राहिले. त्यात समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि रईस शेख तसेच एमआयएमचे शाह फारुख अन्वर यांचा समावेश होता. भाजपचे सदस्य मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप हे आजारपणामुळे अनुपस्थित राहिले. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे तुरुंगात असल्याने ते येऊ शकले नाहीत. एमआयएमचे दुसरे आणदार मुफ्ती इस्माईल हे पण हजर राहिले नाहीत.

Babandada-Lanke-Mohite
Ajit Pawar : अजित पवार म्हणतात, मुख्यमंत्रीच शिवसेनेचा तर सरकार अल्पमतात कसं?

राष्ट्रवादीचे माजी मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने ते येऊ शकले नाहीत. निलेश लंके हे आजारी असल्याने शिरूरमध्ये एका रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे माढ्याचे आमदार बबनदाद शिंदे हे पण येऊ शकले नाहीत. खेडचे आमदार दिलीप मोहिते, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे हे मात्र फिरकले नाहीत. राज्यसभा आणि विधान परिषद या दोन्ही निवडणुकांच्या वेळी मोहिते आणि बनसोडे यांनी मतदानासाठी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. नेत्यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी दोन्ही निवडणुकांत मतदान केले. आता तर त्यांनी मतदानाला येण्याचेच टाळले. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे पीठासीन अधिकारी असल्याने त्यांना मतदान करता आले नाही.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सदस्यांनी उभे राहून आपल्या मतांचा क्रमांक पुकारला. शिवसेनेचे उमेदवार बालाजी कल्याणकर यांनी 145 हा आकडा म्हटल्यानंतर भाजप-शिंदे गटाचे बहुमत झाल्याचे स्पष्ट झाले. सत्ताधारी सदस्यांनी बाके वाजवून या आकड्याचे स्वागत केले.

Babandada-Lanke-Mohite
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधीमंडळाच्या कामकाजापासून रोखा!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. ``अध्यक्षांची उच्च अशी परंपरा विधानसभेला लाभली आहे. दादासाहेब माळवंणकर, शिवराज पाटील हे विधानसभेचे अध्यक्ष होते. ते पुढे लोकसभेचे अध्यक्ष झाले. या अध्यक्षपदाचा लौकीक आपण वाढवाल, असा गौरव शिंदे यांनी केला. याउप्पर या निमित्ताने शिंदे यांनी शिवसेनेला डिवचले. राज्यात आज शिवसेना आणि भाजपचे सरकार स्थापन झाल्याचा दावा करताच सेनेकडून घोषणा देण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 115 आमदार असताना त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. सगळ्यांना वाटलं होत की देवेंद्र हे मुख्यमंत्री होतील मला काय भेटणार? पण भारतीय जनता पक्षाने माझा सन्मान केला. जे वातावरण होतं ते आता बदललं आहे. अनेक आमदार माझ्यासोबत होते. त्यातील काही आमच्या विरोधकांच्या संपर्कात असल्याचा दावा करत होतो. मी म्हणत होतो की त्यांची नावे सांगा मी चार्टर विमानाने पाठवून देतो. पण तसे घडले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com