माजी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसचे ७ आमदार बहुमत चाचणीस गैरहजर; राष्ट्रवादीच्या दोघांची दांडी

एकनाथ शिंदे यांच्या सरकारने आज विधानसभेत बहुमत चाचणी तब्बल १६४ मते घेत जिंकली. दुसरीकडे, महाविकास आघाडीला यावेळी शंभरीही गाठता आली नाही.
Ashok Chavan, Dheeraj Deshmukh, Praniti Shinde
Ashok Chavan, Dheeraj Deshmukh, Praniti ShindeSarkarnama

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सरकारने आज विधानसभेत बहुमत चाचणी तब्बल १६४ मते घेत जिंकली. दुसरीकडे, महाविकास आघाडीला यावेळी शंभरीही गाठता आली नाही. विशेष म्हणजे काँग्रेसचे (Congress) माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासह तब्बल सात आमदार बहुमत चाचणीवेळी अनुपस्थित होते. राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे, आमदार संग्राम जगतापही मतदानाला गैरहजर होते. त्यामुळे महाविकास आघाडीची गाडी शंभराच्या आत अडकली. (Seven Congress MLAs, including the former chief minister, abstained from the majority test)

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाचे राहुल नार्वेकर हे १६४ मते घेऊन विजयी झाले होते, तर महाविकास आघाडीचे राजन साळवी यांना १०७ मते पडली होती. पण बहुमत चाचणीवेळी महाविकास आघाडी शंभरीही गाठू शकलेले नाही. त्यात काँग्रेस पक्षाचे तब्बल सात आमदार अनुपस्थित होते. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, धीरज देशमुख, झिशान सिद्दीकी, जितेश अंतापूरकर, कुणाल पाटील आणि प्रणिती शिंदे यांचा समावेश आहे.

Ashok Chavan, Dheeraj Deshmukh, Praniti Shinde
आजारी आमदार लंके अचानक विधानसभेत दिसले

अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार हे उशिरा आले. त्यावेळी दरवाजा बंद करण्यात आलेले होते, त्यामुळे त्यांना बाहेरच थांबावे लागले. आमदार प्रणिती शिंदे या परदेशात न्यूयॉर्कमध्ये आहेत. विधानसभा अध्यक्ष निवडणूक आणि बहुमत चाचणी या दोन्हीवेळी अनुपस्थित होत्या. आमदार अंतापूरकर यांचे काल लग्न होते. त्यामुळे ते काल आणि आज गैरहजर होते. काल कुणाल पाटील हजर होते. पण, आज ते अनुपस्थित होते.

Ashok Chavan, Dheeraj Deshmukh, Praniti Shinde
शिंदे-भाजपची बहुमत चाचणी: मुनगंटीवारांनी मांडला विश्वासदर्शक प्रस्ताव

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे आणि नगरचे आमदार संग्राम जगताप हेही आज अनुपस्थित होते. महाविकास आघाडी सरकारची एकूण नऊ मते कमी झाली आहेत. काल विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे मत नव्हते. आज त्यांची गणना झाली. दरम्यान, बहुमत चाचणी जिंकल्यानंतर शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांनी भारत माता की जय, जय श्रीरामच्या घोषणा दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com