Satyajit Tambe News : काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अन् भाजपही विरोधात गेली तरी सत्यजीत तांबेंच बाजी मारणार?

Satyajit Tambe News : डॉ. सुधीर तांबे यांनी मतदार नोंदणीमध्ये मोठी आघाडी घेतली आहे.
Satyajit Tambe News
Satyajit Tambe NewsSarkarnama

Satyajit Tambe News : नाशिक पदवीधर मतदारसंघातील सत्यजीत तांबेंची उमेदवारी महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेची ठरत आहे. तांबेंना भाजपा पाठिंबा देणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याची अद्याप घोषणा झालेली नाही. त्यातच अपक्ष उमेदवार धनराज विसपुते आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी नागपूरला गेले आहेत. भाजपाचा (bjp) पाठिंबा मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

दुसरीकडे शुभांगी पाटील यांना शिवसेनेने (Shivsena) पाठिंबा दिला आहे. मात्र, महाविकास आघाडीतल्या राष्ट्रवादी व कॉंग्रेसने अद्याप कोणतीच भूमिका घेतली नाही. त्यामुळे सत्यजीत तांबेंना सर्वजण मिळून एकटे पाडणार की त्यांना दिलेला शब्द भाजपा पाळणार हे येत्या चार दिवसात स्पष्ट होईल. उद्या (ता १६) अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख आहे.

Satyajit Tambe News
मुंबईत ठाकरेंना घेरण्यासाठी भाजपचा मोठा डाव? चहल यांना ईडीची नोटीस अन् पेडणेकरांवर...

कुणी कितीही दावे केले तरी प्रत्यक्षात या निवडणुकीसाठी कुणी किती मतदार नोंदणी केली हे महत्वाचे ठरणार आहे. मतदारनोंदणीच्या आकड्याचा विचार केल्यास तांबे यांच्या जवळपासही कुणी नाही. शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिल्याची मोठी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात येत असली तरी पाटील यांनी वैयक्तिक पातळीवर सुमारे १० हजार पदवीधरांची नोंदणी केली आहे.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे यांनाही सहा महिन्यांपूर्वी भाजपाने पदवीधर नोंदणी करण्यास सांगितली. त्यानुसार विखे-पाटील यांनी सुमारे ४० हजार पदवीधरांची नोंदणी केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या यंत्रणेतून ३० हजार मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे मतदार नोंदणीच्या पातळीवर तांबे यांच्या जवळपासही कुणी नाही.

हा मतदारसंघ सुरवातीपासून कॉंग्रेसकडे (Congress) होता. त्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेनेची कोणतीही तयारी या मतदारसंघात नाही. कॉंग्रेसच्यावतीने डॉ. सुधीर तांबे व सत्यजीत तांबे यांनी दीड लाख मतदारांची नोंदणी केली आहे. कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांनी ही नोंदणी केली असली तरी अपक्ष लढल्यामुळे त्यांच्या मतांमध्ये दहा-पंधरा हजारांच्या मतापलिकडे फारसा फरक पडणार नाही. कारण त्यांनी नोंदणी केलेल्या मतदारांपैकी बहुतांश मतदार तांबे व थोरात यांच्या शिक्षण संस्थांशी संबंधित आहेत.

पदवीधरच्या निवडणुकीत कुणाची राजकीय ताकद किती आहे यापेक्षा नोंदणी किती केलीय हे महत्वाचे ठरते. त्यामुळे नोंदणीच्या पातळीवर तरी तांबेंच्या जवळपासही कुणी नाही. त्यामुळे कुणी कितीही व्ह्यूव्हरचना केली तरी तांबे यांची बाजू फारच मजबूत असल्याचे मतदार नोंदणीवरून स्पष्ट होत आहे.

Satyajit Tambe News
Congress : मोठी बातमी! काँग्रेसमधून सुधीर तांबे यांचे निलंबन

नगरमध्ये १ लाख १६ हजार ३१९ मतदार नोंदणी झाली आहे. त्याखालोखाल नाशिकमध्ये ६६ हजार, ७०९ त्यानंतर जळगावमध्ये ३३ हजार ५४४ तर धुळ्यामध्ये २२ हजार ५९३ आणि नंदुरबारमध्ये १९ हजार १८६ पदवीधरांची नोंदणी झाली आहे. पाच जिल्ह्यात एकूण मतदार नोंदणी सुमारे अडिच लाखांच्या जवळपास झाली आहे.

या निवडणुकीत छानणी आणि माघारीनंतर २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत. या सर्वात सत्यजीत तांबे हेच ताकदवान उमेदवार किमान मतदार नोंदणीवरून तरी दिसत आहेत. गेल्या निवडणुकीत तांबे यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांना ४२ हजार मतांच्या फरकाने निवडून आले होते. सत्यजीत तांबे त्यापेक्षा अधिक मतांनी निवडून येतील, असा विश्‍वास त्यांचे निकटवर्तीय व्यक्त करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in