Sandeep Deshpande : फेक आकाऊंट वरुन कोणाला ट्रोल केले का? देशपांडेंचे सडेतोड उत्तर

Sandeep Deshpande News : 'सरकारनामा ओपन माईक सीजन 2' कार्यक्रमात संदीप देशपांडे उपस्थित होते.
Sandeep Deshpande News
Sandeep Deshpande NewsSarkarnama

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) सोशल मीडियावर (Social Media) सक्रीय असतात. आपल्या पोस्टमुळे ते विरोधकांवर टीकेची झोत उठवतात. त्याच संदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. फेक अकाऊंट वरुन तुम्ही कोणाला ट्रोल केले का? यावर देशपांडे यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले.

'सरकारनामा ओपन माईक' सिजन 2 या कार्यक्रमात देशपांडे बोलत होते. या वेळी भाजप (BJP) आमदार अतुल भातखळकर, काँग्रेस नेते सत्यजित तांबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari), बाळासाहेबांची शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद, मनसेच्या वतीने संदीप देशपांडे, शिवसेना (Shivsena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून आमदार मनीषा कायंदे उपस्थित होत्या.

Sandeep Deshpande News
2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतरही शिंदे मुख्यमंत्री असतील का? अतुल भातखळकर म्हणतात...

देशपांडे यांनी आपल्या स्वभावाप्रमाणे प्रश्नालाही थेट उत्तर दिले. मी फेक अकाऊंड वरुन कोणालाच ट्रोल केले नाही. कोणाला ट्रोल करायचे असले तर मी माझ्याच अकाऊंटवरुन करतो, मी फेक अकाऊंट कशाला वापरु, असे त्यांनी स्पष्टच सांगितले. या प्रश्नानंतर मात्र, उपस्थित नेत्यांनी देशपांडे यांना चांगलेच घेरले. तुमच्या भाषणाची स्क्रिप्ट भाजप लिहितो का? या प्रश्नावर अमोल मिटकरी, मनीषा कायंदे आणि सत्यजित तांबे यांनी देशपांडे यांना घेरले.

देशपांडे म्हणाले, आमची स्क्रिप्ट आम्हीच लिहितो, आमचे भाषण सगळे जण कॉपी करतात, आम्ही हनुमान चालिसेचा मुद्दा घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते मंदीरात जायला लागले. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणाही हनुमान चालिसा म्हणायला लागले, असे देशपांडे यांनी सांगितले. मनसे एकला चलोच्या भूमिकेत आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांवर दाखल झालेला विनयभंगाचा गुन्हा चुकीचा होता, असेही त्यांनी सांगितले. त्यावर भातकळकर यांनीही त्यांना समर्थन दिले.

Sandeep Deshpande News
ठाकरेंकडे १५-१६च आमदार; संधी मिळाली तर शिवसेना सोडणार का? कायदेंनी स्पष्टच सांगितले

'सरकारनामा'चा विशेष कार्यक्रम 'ओपन माईक सिजन 2' लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमात नेत्यांनी एक मेकांना चांगल्याच कोपरखळ्या मारल्या. तसेच अडचणीचे प्रश्न विचारुन कोंडीही केली. तर हास्यविनोद करत कार्यक्रमात रंगत आणली. या कार्यक्रमात नेत्यांनीच नेत्यांना प्रश्न विचारले. त्यावर त्यांची धमाल उत्तरे दिली. तसेच एकमेकांना चांगलेच टोमणेही लगावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com