राणीच्या बागेत गेल्यावर आधी काय बघणार? वाघ की पेग्विंन; मनीषा कायदेंचे स्पष्ट उत्तर

Manisha Kayande News : मनीषा कायंदे 'सरकारनामा ओपन माईक सिजन - 2' कार्यक्रमामध्ये बोलत होत्या.
Manisha Kayande News
Manisha Kayande NewsSarkarnama

Manisha Kayande News : राज्यातील सहा राजकीय पक्षाचे नेते सरकारनामाच्या व्यासपीठावर एकत्र आले होते. यावेळी नेत्यांनीच एकमेकांना प्रश्न विचारून चांगलीच धमाल उडवून दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी थेट प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला कायंदे यांनी सडेतोड उत्तर दिले.

मनीषा कायंदे 'सरकारनामा ओपन माईक सिजन - 2' कार्यक्रमामध्ये बोलत होत्या. या कार्यक्रमाला भाजपचे (BJP) नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar), काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari), बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नेत्या दिपाली सय्यद, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande), उपस्थित होते.

Manisha Kayande News
Manisha Kayande News : शिवसेनेच्या मनीषा कायंदेंनी केला नारायण राणेंचा 'करेक्ट कार्यक्रम'

कार्यक्रमामध्ये तीन राऊंड होते, पहिल्या राऊंड होता, 'काढा डिटेक्टर' यामध्ये नेत्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. दुसरा राऊंड होता 'ईडी' म्हणजेच 'इकडचा डॉन', या राऊंडमध्ये नेत्यांनीच नेत्यांना प्रश्न विचारायचे होते. तीसरा राऊंड 'करेक्ट कार्यक्रम' होता. यामध्ये उपस्थितांना काही कार्ड देण्यात आले होते. त्यामध्ये एक कार्ड त्यांनी निवडायचे होते. त्यावर फोटो असलेल्या नेत्याला ट्रोल करायचे होते.

दुसऱ्या राऊंडमध्ये देशपांडे यांनी कायंदे यांना प्रश्न विचारला, मुंबईतील राणीच्या बागेत गेल्यानंतर तुमच्याकडे शेवटचे १५ मिनिटे आहेत, आणि त्यामध्ये तुम्हाला फक्त एकच प्राणी बघता येणार आहे, तर तुम्ही पेग्विंन बघणार की वाघ? या कायंदे थेट उत्तर देत वाघ बघणार असे सांगितले. कारण शिवसेनेचा वाघच आहे, असे त्यांनी सांगितले.

Manisha Kayande News
ठाकरेंकडे १५-१६च आमदार; संधी मिळाली तर शिवसेना सोडणार का? कायदेंनी स्पष्टच सांगितले

या कार्यक्रमात नेत्यांनी एकमेकांना चांगल्याच कोपरखळ्या मारल्या. तसेच अडचणीचे प्रश्न विचारुन कोंडीही केली आणि हास्यविनोद करत कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमात नेत्यांनीच नेत्यांना प्रश्न विचारले. त्यावर त्यांची धमाल उत्तरे दिली. तसेच एकमेकांना चांगलेच चिमटेही काढले. राजकारणाच्या पलिकडे जाऊन नेते या कार्यक्रमात रंगून गेले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com