Friendship Day : अबू आझमींच्या जिवलग मित्रांच्या यादीतील पहिले नाव म्हणजे गणेश गुप्ता

Abu Aazami | Ganesh Gupta : मी कट्टर हिंदू पण १९९३ साली मुस्लिम मित्र आबू आझमींना जामीनदार राहिलो...
Abu Aazami | Ganesh Gupta
Abu Aazami | Ganesh GuptaSarkarnama

दोन व्यक्ती एक शरीर. एक राम दुसरा रहीम, एक व्यावसायिक तर दुसरा राजकारणी. एक मुस्लिम समाजाच्या हितासाठी झटणारा तर दुसरा कट्टर हिंदुत्व जपणारा. दोन भिन्न धर्म, संस्कृती आणि विचारांनी एकत्र आलेली ही अनोखी मैत्री. राजकारणात एका उंचीवर असतानाही समाजवादी पक्षाचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी (Abu Azmi) आजही त्यांचे जिवलग मित्र गणेश गुप्ता (Ganesh Gupta) यांच्या सोबतचे मैत्रीचे नाते तेवढ्याच आपुलकीने जपतात. केवळ मुस्लिम समाजाचा नेता म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या नेत्याच्या हिंदू मित्रासोबचे हे अतुट नाते अनोख्या मैत्रीचे एक उत्तम उदाहरण मानायला हवे.

अबू आझमी म्हणजे मुस्लिम समाजाचा नेता अशी ओळख ऐकायला मिळते. मात्र, मी मुस्लिमांच्या अन्यायाला वाचा फोडत असलो तरी हिंदू धर्म किंवा अन्य कोणत्याही धर्माचा तिरस्कार कधीच करत नाही. माझ्या जिवलग मित्रांच्या यादीमध्ये पहिले नाव येते ते म्हणजे गणेश गुप्ताचे. व्यावसायिक संबध असल्याने आम्ही चांगले मित्र आहोत. मात्र, मैत्रीत कधीही धार्मिक अडचण आली नाही. एकमेकांच्या सणाला आम्ही कायमच घरी जात असतो. व्यवसाय करताना कार्यालयात मंदिर असते. गणेश एक कट्टर हिंदू आहे. श्री हनुमानचा भक्त असलेला गणेश दररोज न चुकता मंदिरात जातो.

मुंबईत १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटात ११ जणांना तिकीटांची विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पण पुराव्यांअभावी सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. त्यावेळी तुरुंगातून बाहेर येण्यासाठी मीच जामीन देणार असा हट्ट गणेशने केला. त्यानुसार तुरुंगातून बाहेर येण्यासाठी त्याने जामीन दीला. त्यामुळे सुख-दुखःत कायम पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी ही मैत्री आहे.

(अबू आझमी यांचे मित्र गणेश कुमार गुप्ता यांच्या शब्दात)

मुंबईत १९७५ साली व्यवसाय सुरु केला. अबू आझमी यांचे वडील देखील मुंबईत ऍम्ब्रॉयडरीचा कारखाना चालवत होते. त्यांच्या वडिलांसोबत सुरुवातीला ओळख होती. त्यामुळे आम्ही कौटुंबिक मित्र होतो. त्यामुळे संपूर्ण कुटुंबासोबत ओळख होती. त्यानंतर अबू आझमी यांच्या सोबत मैत्रीचे संबंध निर्माण झाले आणि आम्ही दोघे चांगले मित्र झालो. मागील ३८ वर्षापासून व्यवसायिक आणि मैत्रीचे संबंध आहेत. आजपर्यंत आमच्या नात्यांमध्ये कधीही धर्म आडवा आलेला नाही. अनेक लोक अबू आझमी यांना समजण्यास चुक करतात. ते मुस्लीमांच्या बाजूने बोलतात हे खरे आहे, मात्र ते कधी हिंदू किंवा इतर कोणत्याही धर्माच्या विरोधात वाईट बोलत नाहीत.

आजपर्यंत मी त्यांना कधीही हिंदूंच्या विरोधात बोलताना पाहिले नाही. मी स्वतः एक कट्टर हिंदू आहे. माझी दररोज देवाची पूजा असते. माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे. हनुमान चालिसा वाचल्याशिवाय घरातून बाहेर पडत नाही. त्यामुळे आम्ही दोघेही आपआपल्या धर्मावर विश्‍वास ठेवतो. दिवाळी आणि ईदला मात्र आम्ही एकत्र येऊन हे सण साजरे करतो. घरातील कोणाचा विवाह असो किंवा एखादा कार्यक्रम कायमच घरातील सदस्याप्रमाणे हजर असतो.

१९९३ सालच्या बॉम्बस्फोट प्रकरणात पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. मात्र, त्यावेळी देखील ते निर्दोष असतीय याची पूर्ण खात्री होती. त्यावेळी देखील दररोज एकमेकांना भेटत होतो. त्यामुळे काहीही केलेले नाही याची खात्री होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने देखील निर्दोष असल्याचे जाहीर केले. याप्रकरणी जामीन देण्यासाठी मी आणि दिलखुश जोशी होते. सीबीआयचे लोक पडताळणीसाठी आले होते. त्यावेळी तुम्ही का जामीन देत आहात, लोक तुम्हाला चुकीचे समजतील अशी भिती दाखवली. पोलिसांनी त्यांचे काम केले. मात्र, सर्वकाही माझ्यावर अवलंबून होते. त्यामुळे मी न घाबरता मित्रासाठी जामीन दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com