Sakal-Saam Survey : राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष म्हणून कुणाला पसंती?; 'सकाळ-साम' सर्व्हे काय सांगतो?

Sharad Pawar’s Resignation Sakal-Saam TV Survey : पवार कुटुंबाबाहेरच्या अध्यक्षाच्या शक्यतेला किती प्रतिसाद?
Sakal-Saam Survey :
Sakal-Saam Survey :Sarkarnama

Sharad Pawar’s Resignation Sakal-Saam TV Survey : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होणार असल्याची घोषणा केली. पवारांचा या निर्णयाने राजकीय वर्तुळ ढवळून निघाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनाही पवारांचा निर्णय धक्कादायक होता. या निर्णयानंतर पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडून राजीनामा मागे घेण्याची विनंती करण्यात येत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण? याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

Sakal-Saam Survey :
Latur District APMC News : जिल्ह्यात मतदारांचा कौल `फिप्टी-फिप्टी`, देशमुख-निलंगेकरांनी गड राखले..

याच मोठ्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ-साम'च्या माध्यमातून सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एवढ्या मोठ्या घडामोडीनंतर 'सकाळ-साम' सर्वेक्षणातून काही आकडेवारी व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे कल समोर आले आहे. या सर्व्हेक्षणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय नेता म्हणून कोणाला पसंती द्याल? असा प्रश्न विचारण्यात आला.

सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या कलामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे भविष्यातील राष्ट्रीय नेतृत्व म्हणून अनेकांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना पसंती दिली आहे. तब्बल ३५.२ टक्के सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना सुप्रिया सुळे या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात, असे वाटते. तर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना ३२.१ टक्के सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पसंती दिली आहे. तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना १६.६ टक्के कार्यकर्त्यांनी पसंती दर्शवली आहे. तर इतर नेत्यांना नगण्य मते पसंती मिळाली आहे.

Sakal-Saam Survey :
Ajit Pawar On Rumours: ...तोपर्यंत राष्ट्रवादी सोडणार नाही; अजितदादांकडून भाजप प्रवेशाच्या चर्चांवर पडदा

पवार कुटुंबाबाहेरील नेत्यांना अध्यक्षपदासाठी फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. जयंत पाटील यांना १६.६ टक्के कार्यकर्त्यांनी पसंती दिली आहे. तर इतर नेते या चर्चामध्ये कुठेच नसल्याचे दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com