'आमचं काम फत्ते : ‘आयसोलेट’ असताना फडणवीसांनी काय केले, हे निकालात दिसेल'

आमचं जे नियोजन होतं ते फत्ते झालं आहे.
Devendra Fadnavis News, Praveen Darekar News, Rajyasabha Election 2022 News updates
Devendra Fadnavis News, Praveen Darekar News, Rajyasabha Election 2022 News updatessarkarnama

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) भारतीय जनता पक्षाचं (BJP) शिस्तबद्ध नियोजन होते. आमचं जे नियोजन होतं ते फत्ते झालं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devndra Fadnavis) यांनी नियोजन केलेले आहे. कोरोना झाल्यानंतर ‘आयसोलेट’मध्ये असताना फडणवीस यांनी जी भूमिका निभावली आहे, ते लवकरच निकालातून कळेल, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी सांगितले. (Results will show what Fadnavis did while in 'Isolate': Praveen Darekar)

राज्यसभा निवडणुकीत मतदान केल्यानंतर विरोधी पक्षनेते दरेकर बोलत होते. ते म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीतील आमचा आत्मविश्वात कायम आहे. आमचे चेहरे बघा आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचेही बघा. आम्ही निश्चिंत नसतो तर आम्ही कायम काम करतो. महाविकास आघाडीवर नाराज असलेले आमदार हे आमच्यासाठी बोनस पॅाईंट आहे. त्यामुळे जिंकण्याइतका आकडा आमचा होता. महाविकास आघाडीमधील बिघाडीच्या गोंधळाचा फायदा निश्चितपणे मिळणार आहे. (Rajyasabha Election 2022 News updates)

Devendra Fadnavis News, Praveen Darekar News, Rajyasabha Election 2022 News updates
लक्ष्मण जगतापांनी फडणवीसांना 'सीएम साहेब' म्हणून हाक मारली!

जितेंद्र आव्हाड यांनी मतपत्रिका जयंत पाटील यांच्या हातात दिल्याने त्यांचे मत रद्द करण्याची मागणी केली. मात्र, त्यावर प्रतिक्रियाही न देणाऱ्या आव्हाडांना दरेकर यांनी टोला लगावला आहे. ते म्हणाले की, आव्हाडांनी मतदानानंतर क्लायमॅक्स काय होतो, ते बघावं. त्यांनी न्यायालयावर तरी विश्वास ठेवावा. महाविकास आघाडी खुर्चीसाठी आचार विचार सगळं विसरले आहे. लोकशाहीने निवडणूका लढणं, हे संविधानात आहे. पण, लोकशाहीत अपमान वगैरेंच्या गोष्टी करु नये.

Devendra Fadnavis News, Praveen Darekar News, Rajyasabha Election 2022 News updates
देशमुख-मलिकांना उच्च न्यायालयाचा दणका; मतदानाची परवानगी नाकारली

राज्यसभा निवडणुका बिनविरोध होण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, सगळ्या निवडणुका बिनविरोध होतात का. प्रत्येकाला लोकशाही मार्गाने निवडणुका लढण्याचा अधिकार आहे. भाजप पुड्या सोडतंय, या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आरोपांवर दरेकर म्हणाले की, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून पुड्या सोडल्या जातायत, त्याची काळजी घ्यावी.

Devendra Fadnavis News, Praveen Darekar News, Rajyasabha Election 2022 News updates
राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे नाराज ? मतदानाकडे फिरवली पाठ

यशोमती ठाकूर यांची उद्विग्नता हेच दाखवून देते की, त्यांचा पराभव दिसतोय. आम्ही संयमाने निवडणूक लढलोय. आम्ही अधिकृत अथोरिटीकडे तक्रार करून दाद मागणार आहोत. निकलापूर्वीच आम्ही सर्व ठिकाणी दाद मागणार आहोत. आमचं जे नियोजन होतं ते फत्ते झालं आहे. दोन जण यायचे राहिलेत, ते काही क्षणात येतील. आघाडीत एकमत नाही उलट आमच्याकडे एकमुखी नेतृत्व आहे. निवडणूक अधिकाऱ्याने स्पष्ट केलं हे प्रथमदर्शीनी झालं, त्याला आम्ही आव्हान देऊ, असे दरेकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com