Congress News : पालघरमध्ये काँग्रेसला धक्का : बड्या नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

Palghar News: त्यास जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्त करणे म्हणजेच काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलीन करण्यासारखे असल्याचे वनगा यांनी पत्रात नमूद केले आहे.
Congress
CongressSarkarnama

वाडा (जि. पालघर) : काँग्रसचे (Congress) पालघर (Palghar) जिल्हा चिटणीस अनंता वनगा (Ananta Vanaga) यांनी आपल्या पदाचा राजीनामा (Resign) दिला आहे. पक्षाचे जिल्हा निरीक्षक यशवंतसिंह ठाकूर व जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला आहे. वनगा यांच्या राजीनाम्यामुळे जिल्हा काँग्रसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (Resignation of Palghar district secretary Ananta Vanaga of Congress)

राजीनामा पत्रात अनंता वनगा यांनी म्हटले आहे की, मी गेली १२ ते १३ वर्षे पक्षात काम करीत आहे. माझे पक्षातील चांगले काम पाहून मार्च २०२१ मध्ये माझी पालघर जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीपासून ते आजपर्यंत मी संपूर्ण पालघर जिल्ह्यात खेडोपाडी फिरून पक्षसंघटना बळकट करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. तसेच, स्थानिक पातळीवर गोरगरीब व आदिवासी बांधवांचे प्रश्न, समस्या समजावून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला. पण, डहाणू तालुक्यातील ऐना गावातील एक बलात्कार प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असता त्याचा पाठपुरावा करून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Congress
ShivSena-VBA Alliance : मागील काळात आम्हाला वाईट अनुभव आलाय... शिवसेना-वंचित युतीवर काँग्रेसचे भाष्य

हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच आणि आरोपींवर गुन्हा दाखल असतानाच पक्षाने त्या आरोपीची काँग्रेस आदिवासी सेलच्या जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती केली. या आरोपींवर गुन्हा दाखल असतानाच त्यास जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्त करणे म्हणजेच काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलीन करण्यासारखे असल्याचे वनगा यांनी पत्रात नमूद केले आहे. पक्षश्रेष्ठींच्या ही बाब लक्षात आणून देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने व अशा व्यक्तीबरोबर काम करणे मला शक्य नसल्याने मी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे अनंता वनगा यांनी पत्रात म्हटले आहे.

Congress
VijayDada Meet Pawar : विजयदादा बारामतीत जाऊन शरद पवारांना भेटले....

या संदर्भात काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता आदिवासी सेलच्या अध्यक्ष पदावर कोणाचीही नेमणूक केलेली नाही. तसेच, न्यायप्रविष्ट प्रकरणातील व्यक्तीची निवड केली जाणार नाही. अशा व्यक्तीस माझाही विरोध राहील, असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com