ZP Presidents Reservation : राज्यातील ३० ZP अध्यक्षांचे आरक्षण जाहीर; सोलापूर ओबीसी, तर पुणे खुले

ग्रामविकास विभागाच्या या निर्णयामुळे झेडपीच्या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोग त्या कधी घेणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
ZP Presidents Reservation
ZP Presidents ReservationSarkarnama

मुंबई : राज्यातील सुमारे ३० जिल्हा परिषदांमधील (ZP) अध्यक्षपदाचे (president) आरक्षण (Reservation) जाहीर झाले आहे. ग्रामविकास विभागाने ३० सप्टेंबर रोजी याबाबतचा शासकीय निर्णय जाहीर केला आहे. यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), तर पुणे झेडपीचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे. ग्रामविकास विभागाच्या या निर्णयामुळे झेडपीच्या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोग त्या कधी घेणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. (Reservation of 30 ZP presidents in the state announced)

एकीकडे राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका राज्य सरकारने लांबवणीवर टाकल्या आहेत. तसेच, महानगरपालिका आणि नगरपालिकांसदर्भातही राज्य सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला आहे. मात्र, ग्रामविकास विभागाने ३० सप्टेंबर रोजी राज्यातील ३० झेडपी अध्यक्षांचे आरक्षण जाहीर केले आहे. त्यामुळे निकटच्या काळात निवडणुका लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ZP Presidents Reservation
Dussehra Melava :सोलापुरातून दोन हजार शिवसैनिक दसरा मेळाव्याला जाणार

राज्यातील जिल्हा परिषदांचे जिल्हानिहाय आरक्षण पुढील प्रमाणे

ठाणे : सर्वसाधारण

पालघर : अनुसूचित जमाती

रायगड : सर्वसाधारण

रत्नागिरी : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

सिंधुदुर्ग : सर्वसाधारण

ZP Presidents Reservation
मुख्यमंत्र्यांना साफसफाई करायची की हाथसफाई? : नीलम गोऱ्हेंचा शिंदेंना टोला

नाशिक : सर्वसाधारण (महिला)

धुळे : सर्वसाधारण (महिला)

जळगाव : सर्वसाधारण

नगर : अनुसूचित जमाती

नंदुरबार : अनुसूचित जमाती (महिला)

ZP Presidents Reservation
रक्ताची नाती कधीही संपत नसतात; पण... : पंकजांचे धनंजय मुंडेंना प्रत्युत्तर

पुणे : सर्वसाधारण

सोलापूर : नागरिकांचा मागास प्रवर्ग

सातारा : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

सांगली : सर्वसाधारण (महिला)

कोल्हापूर : सर्वसाधारण (महिला)

ZP Presidents Reservation
आमदारांना माहित नसलेला पंढरीचा विकास आराखडा कुणी तयार केला : भालकेंचा हल्लाबोल

औरंगाबाद : सर्वसाधारण

बीड : अनुसूचित जाती

नांदेड : नागरिकांचा मागास प्रवर्ग

उस्मानाबाद : सर्वसाधारण (महिला)

परभणी : अनुसूचित जाती

जालना : नागरिकांचा मागास प्रवर्ग

लातूर : सर्वसाधारण( महिला)

ZP Presidents Reservation
मागील सरकारच्या काळात विरोधकांनी सातत्याने त्रास दिला : हर्षवर्धन पाटलांचा रोख कोणाकडे?

हिंगोली : सर्वसाधारण (महिला)

अमरावती : सर्वसाधारण (महिला)

अकोला : सर्वसाधारण (महिला)

यवतमाळ : सर्वसाधारण

बुलढणा : सर्वासाधारण

वाशिम : सर्वसाधारण

नागपूर अनुसूचित जमाती

वर्धा : अनुसूचित जाती (महिला)

चंद्रपूर :अनुसूचित जाती (महिला)

भंडारा : अनुसूचित जमाती (महिला)

गोंदिया : नागरिकांचा मागास प्रवर्ग

गडचिरोली : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com