Maharashtra Politic's : शिरसाट, गोगावले, कडूंना मंत्रीपद मिळणार की अपात्रतेच्या निर्णयापर्यंत वाट पहावी लागणार..?

अनेकांची सुप्त इच्छा निकालानंतर उफाळून येण्याची शक्यता आहे.
Eknath Shinde-Sanjay Shirsat, Bharat Gogawle, Bachu Kadu
Eknath Shinde-Sanjay Shirsat, Bharat Gogawle, Bachu KaduSarkarnama

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण त्यांच्यासमोरील डोकेदुःखी वाढण्याची शक्यता आहे. कारण मंत्रिपदासाठी मोठा रस्सीखेच भाजप आणि शिवसेनेत पहायला मिळू शकतो. विशेषतः पहिल्या यादीत नाव असलेले संजय शिरसाट, भरत गोगावले, बच्चू कडू यांना संधी मिळणार की पुन्हा आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यापर्यंत वाट पाहवी लागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Relief from the Supreme Court; But the MLA will increase Eknath Shinde's headache)

महाराष्ट्रात जास्तीत जास्त ४३ जणांचे मंत्रिमंडळ असू शकतं. शिंदे-फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आतापर्यंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह वीस जाणांचा समावेश करण्यात आलेला आहे. उर्वरीत २३ मंत्रिपदांपैकी (Minister) भाजपच्या (BJP) वाट्याला किती येणार आणि शिवसेनेला (Shivsena शिंदे गट) किती मंत्रीपदं मिळणार हे पाहावे लागणार आहे. कारण, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये भाजप आमदारांची संख्या ही तब्बल १०६ इतकी आहे. त्यानंतर भाजपने शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिले आहे, त्यामुळे मंत्रिमंडळात सहाजिकच भाजपला सर्वाधिक वाटा मिळण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde-Sanjay Shirsat, Bharat Gogawle, Bachu Kadu
Shahaji Patil Reaction : शहाजीबापूंची तिखट प्रतिक्रिया : ‘काय झाडी, काय डोंगार, काय हिरवळ..राऊतांना हाणायला हुडकायला लागलाय झिरवळ...’

शिंदे गटातील अनेक आमदारांना मंत्रिपदाचे आमिष दाखविण्यात आलेलं आहे. त्यामुळे अनेकांची सुप्त इच्छा निकालानंतर उफाळून येण्याची शक्यता आहे. पहिल्या विस्तारात ऐनवेळी पत्ता कट झालेले संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांना प्राधान्याने संधी द्यावी लागणार आहे. तसेच, अपक्ष आमदार बच्चू कडू यांना मंत्री करावे लागणार आहे. कारण आधीच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. पहिल्या विस्तारात संधी मिळाल्याने त्यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली होती.

Eknath Shinde-Sanjay Shirsat, Bharat Gogawle, Bachu Kadu
Supreme Court Result : उद्धव ठाकरेंचा राजीनामा ठरला 'टर्निंग पॉईंट'; 'ती' भीती अखेर खरी ठरली !

पहिल्या विस्ताराच्या वेळी शिंदे गटात मंत्रिपदासाठी घडलेल्या नाट्यमय घडामोडींची चर्चा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चर्चिली गेली होती. अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांचा आक्रमक पवित्रा आणि त्यानंतर त्यांचा मंत्रिमंडळात झालेला समावेश हाही चर्चेचा विषय झाला हेाता. सत्तार यांच्यामुळेच शिरसाटांचा पत्ता कट झाल्याची चर्चा हेाती. शिरसाट हे सत्ताराच्या मतदारंसघातील कार्यक्रमालाही गेले नव्हते, त्यामुळे आता तरी शिरसाट यांची वर्णी लागणार की नाही, असा प्रश्न आहे.

Eknath Shinde-Sanjay Shirsat, Bharat Gogawle, Bachu Kadu
Supreme Court Result : शिंदे गटाला कोर्टाचा मोठा दिलासा : मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच राहणार

दरम्यान, भाजपच्या आमदारांची संख्याही मोठी असल्याने त्यांना किती मंत्रीपदे मिळणार आणि ती नेमकी कोणा कोणाच्या वाट्याला येणार, याची स्पर्धाही भाजपत रंगणार आहे. भाजपतही अनेकांनी मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेले आहे. जिल्हा-जिल्ह्यात मंत्रीपद मिळविण्यासाठी चुरस आहे. त्याचबरेाबर महामंडळे, देवस्थान, समित्या यावरही वर्णी लागावी, यासाठी स्पर्धा रंगणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com