...तर आम्ही त्यांच्यासोबत एकत्र येण्यास तयार : अशोक चव्हाणांबाबत दानवेंचे वक्तव्य

मूळ शिवसैनिक आमच्याकडे आले आहेत. आम्ही आता बहुमतात आहे.
Ashok Chavan-Devendra Fadnavis-Raosaheb Danve
Ashok Chavan-Devendra Fadnavis-Raosaheb DanveSarkarnama

मुंबई : भारतीय जनता पक्षाला (BJP) सध्या इतर कोणताही पक्ष फोडण्यात इंटरेस्ट नाही. पण, इतर कोणत्या पक्षात फूट पडत असेल आणि ते जर आम्हाला (भाजपला) मदत करत असतील तर आम्ही त्यांच्यासोबत एकत्र येण्यास तयार आहोत, असे विधान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केले आहे. (Raosaheb Danve's reaction to Ashok Chavan-Devendra Fadnavis meeting)

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीवर रावसाहेब दानवे बोलत होते. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्ष कोणता पक्षही फोडत नाही. पण, एखाद्या पक्षात फूट पडत असेल आणि ते जर भाजपला मदत करणार असतील तर आम्ही त्यांच्यासोबत एकत्र काम करण्याय तयार आहोत. शिवसेनेने ज्यांच्यावर आरोप केले आहेत, त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर शिवसेनेने संगत केली. त्यांच्यासोबत सरकार बनवलं, हे राज्यातील जनतेला पसंत नव्हते. त्यामुळे केवळ जनतेला नव्हे; तर विधानसभेतील आमदारांनाही पसंत नव्हते. त्यामुळे असंतोष उफाळून आला आणि मूळ शिवसैनिक आमच्याकडे आले आहेत. आम्ही आता बहुमतात आहे, असेही केंद्रीय मंत्री दानवे यांनी स्पष्ट केले.

Ashok Chavan-Devendra Fadnavis-Raosaheb Danve
सोलापूर विद्यापीठातील सिनेट, विद्या परिषद, अभ्यास मंडळांसाठी निवडणूक जाहीर; २९ सप्टेंबरला मतदान

दरम्यान, अशोक चव्हाण यांच्यासोबतच्या भेटीचा फडणवीस यांनी इन्कार केला आहे. चव्हाण यांच्यासोबत माझी भेट झालेली नाही. गणपतीच्या दर्शनाठी एका ठिकाणी मी गेलो होतो, त्यावेळी तेही त्या ठिकाणी आले. आमची भेट वगैरे काहीही झालेली नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

Ashok Chavan-Devendra Fadnavis-Raosaheb Danve
‘ते’ चित्र हटवून पक्षनिष्ठा देखावा लावा; सेनेतील बंडखोरीवर भाष्य करणारा देखावा लावण्यास कोर्टाची परवानगी

अशोक चव्हाण यांचे एकेकाळचे सहकारी आणि सध्या भाजपकडून मंत्री झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र वेगळे मत मांडले आहे. अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेशाचा प्रस्ताव आला विचार करण्यात येईल. हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. त्यासंदर्भातील निर्णय हे भाजपचे श्रेष्ठीच घेतील. सध्या काँग्रेस पक्षाला काय भवितव्या राहिलं आहे, असा सवाल करत त्यामुळेच कार्यकर्ते आता स्वतःचा विचार करत आहेत, असेही मत विखे पाटील यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com