रामदास कदमांचा रोखठोक बाणा : 'मला विधान परिषद आणि मंत्रिपदही....'

रामदास कदम यांच्या ज्येष्ठत्वाचा विचार करता त्यांचा शिंदे गटाकडून मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.
Ramdas Kadam
Ramdas KadamSarkarnama

मुंबई : एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) मंगळवारी (ता. ९ ऑगस्ट) सकाळी ११ अकरा वाजता होणार आहे. पहिल्या टप्प्यात १२ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक नावांची सध्या चर्चा सुरू आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांच्या नंदनवन या बंगल्यावर झालेल्या बैठकीला माजी मंत्री रामदास कदमही (Ramdas Kadam) उपस्थित होते. कदम यांच्या ज्येष्ठत्वाचा विचार करता त्यांचा शिंदे गटाकडून मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, खुद्द कदम यांनीच मंत्रिपदाबाबच्या चर्चेवर रोखठोक उत्तर देत पडदा टाकला आहे. (Ramdas Kadam will not be in the Maharashtra cabinet)

रामदास कदम हे विधान परिषदेचे आमदार होते. शिंदे गटातही त्यांना मंत्रिपद देण्यावरून नाराजीची भावना होती. मात्र, कदम यांनीच मंत्रिपदाबाबत स्पष्टपणे सांगितले. शिंदे-फडणवीस यांच्यासोबतची बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या किंवा परवा होईल, असो सांगितले. त्यानंतर त्यांच्या मंत्रिपदाबाबत विचारले असता त्यांनी ‘रामदास कदम मंत्रिमंडळात नसेल आणि विधान परिषदेतही नसेल’ असे आपल्या आक्रमक शैलीत सांगून टाकले. त्यांच्या या उत्तराने मात्र त्यांच्या समर्थकांना धक्का बसला आहे.

Ramdas Kadam
मोठी बातमी : शिंदे गटाचे सामंत, भुसे, भुमरे, सत्तार, देसाई होणार मंत्री; भाजपकडून लोढांना संधी

मागील शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रिपद होते. मात्र, महाविकास आघाडी सरकारमध्ये मात्र त्यांना स्थान देण्यात आले नव्हते. त्यानंतरच्या काळात माजी मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टसंदर्भातील कागदपत्रे कदम यांनीच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना दिल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. महाविकास आघाडीच्या काळात त्यांना अडगळीत टाकण्यात आले होते. त्यानंतर त्यांना दसरा मेळाव्याचे निमंत्रणही देण्यात आले नव्हते.

Ramdas Kadam
मंत्रिपदासाठी भाजपची चार नावे निश्चित; चंद्रकांतदादा, विखे पाटील, मुनगंटीवार, महाजनांचा समावेश

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात कदम यांचे चिरंजीव आमदार योगेश कदमही सहभागी झाले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांनीही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर तोफ डागत शिंदे गटात डेरेदाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला होता. आदित्य ठाकरे माझ्यासोबतच राहून शिकले आहेत. ते माझेच खाते घेतील, असे कधीही वाटले नव्हते. प्लॅस्टिकबंदीचा निर्णय मी घेतला पण त्याचे श्रेय आदित्य ठाकरे यांना देण्यात आले, असोही आरोप त्यांनी केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com