...तर अजितदादांनी सगळी शिवसेना खाऊन टाकली असती : रामदास कदमांचा आरोप

शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेबांचं नाव घेण्याचा उद्धव ठाकरेंना अधिकार नाही
Uddhav Thackeray-Ajit Pawar-Ramdas Kadam
Uddhav Thackeray-Ajit Pawar-Ramdas Kadam Sarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जर बंडाचे पाऊल उचलले नसते तर पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे (shivsena) पाच आमदारही निवडून आले नसते. सगळं संपलं असतं. उलट एकनाथ शिंदे यांचे मी आभार मानेन, त्यांना धन्यवाद देईन, कारण त्यांनी बाळासाहेबांची (Balasaheb Thackeray) शिवसेना जिवंत ठेवली. नाही तर अजितदादांनी (Ajit Pawar) पुढच्या अडीच वर्षांत सगळी शिवसेना खाऊन टाकली असती. काहीही शिल्लक राहिलं नसतं, असा दावा माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केला आहे. (Ramdas Kadam criticizes Uddhav Thackeray, Ajit Pawar)

आगामी दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. त्यावेळी त्यांनी शिंदे बंड केले नसते तर अजित पवारांनी सर्व शिवसेना संपवली असते, असे खळबळजनक विधान केले आहे.

Uddhav Thackeray-Ajit Pawar-Ramdas Kadam
बुलडाणा हा बिहार नाही; हल्ल्याचा उद्रेक संपूर्ण जिल्ह्यात होईल : शिवसेनेचा इशारा

उद्धवसाहेब, ज्या दिवशी तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत जाऊन मुख्यमंत्री झालात, त्याच दिवशी तुमचा आणि बाळासाहेब ठाकरे यांचा विषय संपला ना. आता बाळासाहेबांचं नाव उद्धव ठाकरे कसे घेऊ शकतात. ज्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात बाळासाहेबांनी उभं आयुष्य संघर्ष केला, त्याच शरद पवारांच्या मांडीवर तुम्ही जाऊन बसलात. त्यामुळे तुम्हाला बाळासाहेबांची शिवसेना कशी म्हणता येईल. त्यामुळे शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेबांचं नाव घेण्याचा उद्धव ठाकरेंना अधिकार नाही, सडेतोड बोल माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सुनावले.

Uddhav Thackeray-Ajit Pawar-Ramdas Kadam
शिवसेनेच्या कार्यक्रमात आमदार गायकवाडांच्या पुत्रासह कार्यकर्त्यांचा राडा; मारहाण झाल्याचा आरोप

मंत्रिमंडळा विस्ताराच्या पुढच्या टप्प्याबाबत बोलताना रामदास कदम म्हणाले की, मंत्रिमंडळाची संख्या सध्या कॅबिनेटला हवी आहे, तेवढ्या मंत्र्यांची संख्या सध्या तरी आहे. त्यामुळे उर्वरीत विस्तारही पुढच्या पंधरा दिवसांत होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in