गांधीजींच्या सल्ल्यानुसार सावरकरांची माफी? : राजनाथसिंहांचा अभ्यास कमी पडला..

स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्याविषयीच्या पुस्तक प्रकाशनातच वादग्रस्त विधान
गांधीजींच्या सल्ल्यानुसार सावरकरांची माफी? : राजनाथसिंहांचा अभ्यास कमी पडला..
Mohan Bhagwat and Rajnath sinha twitter

नवी दिल्ली : अंदमानच्या तुरूंगातून सुटका करून घेण्यासाठी इंग्रजांकडे माफीनामा द्यावा असा सल्ला दस्तुरखुद्द महात्मा गांधींनी सावरकरांना दिला होता, या संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या दाव्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.

गांधीजींचे वंशज व विरोधी पक्षीय नेत्यांनी यावरून भाजपवर टीकेची झोड उठविली असून ‘ यांचे हे धंदे असेच चालू राहिले तर एक दिवस गांधींना हटवून सावरकरांना राष्ट्रपिता ठरविण्याच्या कारस्थानाचीची ती सुरवात असेल,‘ असा तीव्र हल्लाबोल एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी संघपिरवारावर चढविला आहे. खुद्द सावरकरांना असा कोणाचाही सल्ला मिळाला नव्हता व मिळाला असता तरी छत्रपती शिवरायांची रणनीती वगळता इतरांचे सल्ले त्यांनी अमान्यच केले असते, असे सावरकरांचे वंशज सात्यकी सावरकर यांनी `सरकारनामा`ला ला सांगितले.

Mohan Bhagwat and Rajnath sinha
महात्मा गांधींच्या सांगण्यावरूनच सावरकरांनी मागितली माफी!

सावरकर यांच्यावरील 'वीर सावरकर : द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन' या पुस्तकाचे प्रकाशन सरसंघचालक मोहन भागवत व राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत काल झाले. त्यावेळी राजनाथसिंह यांनी हा दावा केला.

राजनाथसिंह यांनी हा दावा करताना राष्ट्रपित्याने २५ जानेवारी १९२० मध्ये सावरकरच्या बंधूंना लिहीलेल्या पत्राचा आधार घेऊन सुतावरून स्वर्ग गाठल्याची सार्वत्रिक प्रतीक्रिया व्यक्त होत आहे. त्या पत्रातील आशयाचीच राजनाथसिंह यांनी विकृत मोडतोड केली, असे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी साधार स्पष्ट केले. मोदी सरकारमधील अत्यल्प मान्यताप्राप्त व मवाळ नेत्यांत राजनाथसिंह यांचा समावेश होतो. मात्र इतिहासाचे हवे तसे पुनर्लेखन करण्याची संघाची खोड त्यांनाही लागली असावी असा टोला रमेश यांनी लगावला आहे. त्यांनी गांधीजींचे १९२० मधील पत्रही ट्विट केले असून त्यात कोठेही सावरकरांनी सुटकेसाठी इंग्रजांची माफी मागावी असा अंगुलीनिर्देश केलेला नाही, असे रमेश यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

Mohan Bhagwat and Rajnath sinha
.... तेव्हा नारायण राणेंचे सावरकर प्रेम कुठे होते? 

सावरकरांना माफी मागण्याची सवयच होती हे आम्ही कित्येक वर्षांपासून सांगत होतो त्याची पुष्टी केल्याबद्दल आम्ही राजनाथसिंह यांचे आभारी आहोत असे गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी खोचकपणे सांगितले. ते म्हणाले की असे नवीन इतिहासकार आपल्या समोर येत आहेत त्यांचे स्वागत केले पाहिजे ! वस्तुतः सावरकरांनी पहिला माफीनामा दिला तेव्हा गांधीजी दक्षिण अफ्रिकेत सत्याग्रह करत होते. त्यांचे भारताडके लक्ष नव्हते तरीही राजनाथसिंह यांनी गांधीजींचा संदर्भ सावरकरांच्या माफीनाम्याला चिटकवला. संघपरिवाराला गांधी इतके खटकतात की कोणत्याही बाबतीत गांधींचा उल्लेख केल्याशिवाय त्यांचे पाऊल पुढे पडत नाही. ज्या विचारसरणीने गांधींची हत्या केली त्यांनाच कोणत्याही बाबतीत गांधींचे नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. सावरकरांचे उदात्तीकरण करतानाही त्यांना आजही गांधींचाच अधार घ्यावा लागतो, असाही टोला तुषार गांधी यांनी लगावला.

Mohan Bhagwat and Rajnath sinha
'ते' सावकरांना राष्ट्रपिता म्हणून घोषित करतील ; राजनाथ सिंहांवर ओवैसी संतप्त

ओवेसी म्हणाले की सावरकरांना राष्ट्रपिता बनविण्याच्या कारस्थानाचा हा भाग आहे. हे विकृत इतिहास सांगत आहेत. खरे म्हणजे गांधीहत्येच्या कटात सावरकर दोषी आहेत असे न्या. कपूर आयोगाने स्पष्टपणे म्हटले होते. गांधीजींनी माफी मागण्याचा सल्ला फक्त सावरकरांनाच कसा दिला. त्या वेळी अंदमानात अनेक जण काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते. गांधीजींनी त्यांना तसा सल्ला का दिला नाही? ब्रिटीशांवरूध्द अहिंसात्मक आंदोलन करणे व तुरूंगात जाणे हाच गांधीमार्ग होता. सुटकेसाठी वारंवार माफी मागणे हा नव्हे.

याबाबत सावरकरांच्या वंशजांतही मतभिन्नता दिसते. ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुटकेसाठी जे अर्ज केले ते गांधींना मान्य होते,‘ असा दावा रणजीत सावरकर यांनी केला आहे. सावरकरांची सुटका वव्हावी यासाठी गांधींनी दोन लेख लिहीले, असेही ते म्हणाले. मात्र सात्यकी सावरकर यांच्या मते राजनाथसिंह असे बोलले असतील तर ते संपूर्ण चुकीचे आहे. त्यांनी सांगितले की सावरकरांनी आपल्या देशकारणाच्या व स्वातंत्र्य मिळविण्याच्या योजनेच्या बाबतीत कधीही गांधीमार्गाचा किंवा अहिंसेच्या रस्त्याचा अवलंब केलेला नाही. शत्रूच्या मगरमिठीतून सुटण्यासाठी त्यांनी मार्ग चोखाळला तो फक्त शिवाजी महाराजांचा. शिवराय हेच सावरकरांचे आदर्श होते हे धनंजय कीर व अनेक चरित्रकारांच्या ग्रंथांमधून पुरेसे स्पष्ट होते. गांधी व सावरकरांची लंडनमध्ये कदाचित भेट झाली असेल. पण तेव्हा सावरकरांना अटक होऊ शकते, काळ्या पाण्याची शिक्षा होऊ शकते या बाबी गृहीत धरून नंतर काय करायला हवे, याबाबत उभयतांत चर्चा झाली असेल हे संभवत नाही. तसे काही पुरावे नाहीत असेही सात्यकी सावरकर म्हणाले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in