राजेश क्षीरसागरांनी शब्द पाळला; शिवसेनेच्या प्रभावक्षेत्रातून जाधवांना ६५९० चे मताधिक्क्य!

‘मातोश्री’चा आदेश पाळत राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसैनिकांनी काँग्रेसचे काम केल्याचे उघड
राजेश क्षीरसागरांनी शब्द पाळला; शिवसेनेच्या प्रभावक्षेत्रातून जाधवांना ६५९० चे मताधिक्क्य!
Kolhapur Byelection ResultSarkarnama

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना (shivsena) आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी शब्द पाळत आपल्या भागातून काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव (Jayshree jadhav) यांना ६ हजार ५९० चे मताधिक्क्य मिळवून दिले आहे. विशेष म्हणजे क्षीरसागर यांचा प्रभागातून तब्बल १७३२ मते भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्यापेक्षा अधिक मिळाली आहेत. त्यामुळे ‘मातोश्री’वरून आलेला आदेश पाळत क्षीरसागर आणि शिवसैनिकांनी काँग्रेससाठी (congress) काम केल्याचे मतमोजणीतून पुढे आले आहे. (Rajesh Kshirsagar of Shiv Sena followed the word and got Congress majority)

कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सोडल्याने येथील माजी आमदार राजेश क्षीरसागर कमालीचे नाराज झाले होते. त्या नाराजीतून ते दोन दिवस नॉट रिचेबल होते. मात्र, मातोश्रीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश येताच क्षीरसागर हे आपली नाराजी बाजूला ठेवून जयश्री जाधव यांच्या प्रचारात सहभागी झाले होते.

Kolhapur Byelection Result
शिवसेनेच्या मतांबाबत सतेज पाटील म्हणाले...

पोटनिवडणुकीच्या आज झालेल्या मतमोजणीत क्षीरसागर यांचे वर्चस्व असलेला भाग आणि खुद्द क्षीरसागर यांचा प्रभाग यामधून जयश्री जाधव यांना तब्बल ६५९० मतांचे अधिक्य दिले आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या भागातील मतमोजणी बाराव्या फेरीपासून सुरू झाली. ती अठराव्या फेरीपर्यंत सेनेचा बालेकिल्ला असलेला भाग आहे. त्यामध्ये सोळावी आणि सतरावी फेरी वगळता उर्वरीत पाच फेऱ्यांमध्ये जाधव यांना मोठे मताधिक्य शिवसैनिकांनी दिले आहे.

Kolhapur Byelection Result
चंद्रकांत पाटलांना कोल्हापूरच्या जनतेने पुन्हा पुण्याला पाठविले : सतेज पाटलांचा हल्लाबोल

बाराव्या फेरीत राजारामपुरी, शाहूपुरी, उद्यमनगर, लक्ष्मीपुरी आणि रविवार पेठ या भागाची मतमोजणी झाली. त्यात जयश्री जाधव यांना तब्बल १०३८ मते अधिक आहेत. तेराव्या फेरीत शिवाजी चौक, महाराणा प्रताप चौक, शाहू टॉकीज, महानगर पालिका परिसरातील मतांची मोजणी करण्यात आली, त्यात काँग्रेसला भाजपपेक्षा १९६४ मते अधिक मिळाली आहेत. अकबर मोहल्ला, टाऊन हॉल, बुरुड गल्ली, शुक्रवार पेठ, तोरस्कर चौक या भागाचा समावेश असलेल्या मतांची मोजणी चौदाव्या फेरी झाली, त्यातही जाधव यांना १०८७ मते अधिक आहेत. काँग्रेसचा प्रभाव असलेले सिद्धार्थनगर, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा प्रभाग असलेल्या बुधवार तालीम, पंचगंगा तालीम, खोलखंडोबा येथील मतमोजणी पंधराव्या फेरीत झाली. तेथूनही क्षीरसागरांनी १७३२ मते जाधव यांना अधिकची दिली आहेत.

Kolhapur Byelection Result
माजी मनसैनिकाचे खुद्द राज ठाकरेंना आव्हान; सोलापुरात ताफा अडविण्याचा इशारा

खोलखंडोबा, शुक्रवार पेठ, शाहू उद्यान या भागातील मतांची मोजणी सोळाव्या फेरीत झाली. या ठिकाणी मात्र भाजपचे सत्यजित कदम यांना २०९ एवढी अल्प आघाडी मिळाली आहे. तसेच सतराव्या फेरीत गंगावेश, बाबुजमाल, रंकाळा वेश, उत्तरेश्वर, दुधाळी या भागातील मतांची मोजणी झाली, त्यातही कदम यांना जाधव यांच्यापेक्षा ६९३ मते अधिक मिळाली आहेत. ह्या दोन फेरी वगळता शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या भागात काँग्रेसला अधिक मते मिळालेली आहेत. अठराव्या फेरीत मीराबाग, संध्या मठ, फिरंगाई या भागाची मते मोजण्यात आली, त्यातही काँग्रेसच्या जाधव यांना ७६९ मते भाजपच्या कदम यांच्यापेक्षा अधिक मिळालेली आहेत.

Kolhapur Byelection Result
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पवारांकडून दिलासा : पश्चिम महाराष्ट्रातील यंत्रणा राबवून सर्व ऊस तोडणार

शिवसेनेचा प्रभाव असलेल्या भागात काँग्रेस व भाजप उमेदवाराला मिळालेली मते आणि मताधिक्क फेरीनिहाय

बारावी फेरी

काँग्रेस : 3,946

भाजप : 2,908

मताधिक्क्य : 1,038 (काँग्रेस)

तेरावी फेरी

काँग्रेस : 4,386

भाजप : 2,432

मताधिक्क्य : 1,964 (काँग्रेस)

चौदावी फेरी

काँग्रेस : 3,756

भाजप : 2,669

मताधिक्क्य : 1,087 (काँग्रेस)

पंधरावी फेरी

काँग्रेस : 3,788

भाजप : 2,056

मताधिक्क्य : 1,732 (काँग्रेस)

सोळावी फेरी

काँग्रेस : 3,638

भाजप : 3,847

मताधिक्क्य : 209 (भाजप)

सतरावी फेरी

काँग्रेस : 2,795

भाजप : 3,488

मताधिक्क्य : 693 (भाजप)

आठरावी फेरी

काँग्रेस : 3,948

भाजप : 3,189

मताधिक्क्य : 769 (काँग्रेस)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.