प्रतोदपदी नेमलेल्या राजन विचारेंच्या मनात तरी काय...? ठाकरे की शिंदे अजूनही ठरेना!

खासदार राजन विचारे यांची मातोश्रीवरील बैठकीला अनुपस्थिती
Rajan Vichare
Rajan VichareSarkarnama

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ‘मातोश्री’वर (Matoshri) बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीस तब्बल १० खासदारांची गैरहजेरी होती. यामध्ये सर्वाधिक ठळकपणे जाणवणारी अनुपस्थिती होती ती, ठाण्याचे खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांची. खरं तर शिवसेनेने त्यांची पक्षाचे प्रतोद म्हणून नेमणूक केली होती. मात्र, अत्यंत महत्वाचे पद देऊनही विचारे यांनी अनुपस्थिती लावल्याने त्यांच्या मनात चाललंय तरी काय, अशी सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. (Rajan Vichare's absence from the meeting on Matoshri)

राजन विचारे हे तसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गडातून म्हणजेच ठाण्यातून खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतरही विचारे यांनी अजूनतरी कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. विशेष म्हणजे शिवसेनेने बोलावलेल्या बैठकांना हजेरीही लावली नाही आणि शिंदे यांचं उघडपणे समर्थनही केलेले नाही. तसं बघायला गेलं तर खासदार विचारे यांची गणना ही एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून हेाते. त्याचमुळे शिवसेनेच्या गोटातून त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले जात असावे.

Rajan Vichare
मोहिते पाटील गटाला पुन्हा येणार सुगीचे दिवस; मंत्रीपदासाठी रणजितसिंहांचे नाव चर्चेत

शिवसेनेने मागील काळात बोलावलेल्या बैठकीला राजन विचारे यांची अनुपस्थिती होती. त्यावेळी त्यांनी आपण अमरनाथ यात्रेला गेलो असल्याचे सांगितले होते. त्यानंतर घडलेल्या घडोमाडीत यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनी भाजपसोबत युती करण्याचा अनाहूत सल्ला पक्षनेतृत्वाला दिला. त्यानंतर नेतृत्वाने त्यांच्याकडील पक्षप्रतोद पद काढून घेतले होते. त्यांच्या जागी विचारे यांची नेमणूक करण्यात आली होती. खरं तर हे पद ताकदवान आहे. संसदेत मतदान करताना पक्षाचा व्हीप काढण्याचे काम प्रतोदच करतात. तसेच, कारवाईसाठी पत्र देण्याचे कामही पक्षप्रतोदकडून होते. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत अत्यंत कळीचे पद हाती येऊन विचारे यांनी मातोश्रीवरील बैठकीला गैरहजर राहून आपल्या मनात काय चालेले आहे, हे तर सांगितले नाही ना, अशीही चर्चा आता रंगू लागली आहे.

Rajan Vichare
मोठी बातमी : शिवसेनेला मोठा धक्का; ‘मातोश्री’वरील बैठकीला १० खासदारांची दांडी

मातोश्रीवरील बैठकीला या खासदारांची दांडी

भावना गवळी (यवतमाळ-वाशिम), राजेंद्र गावित (पालघर), संजय जाधव (परभणी), संजय मांडलिक, (कोल्हापूर), हेमंत पाटील (हिंगोली), ओमराजे निंबाळकर (उस्मानाबाद), श्रीकांत शिंदे (कल्याण-डोंबिवली), कृपाल तुमाने (रामटेक), राजन विचारे (ठाणे), कलाबेन डेलकर (दादरा-नगर हवेली).

Rajan Vichare
बंडखोर आमदार भरत गोगावलेंच्या गाडीला अपघात; तिसरा बंडखोर अपघाताला सामोरे

बैठकीला हजर असणारे खासदार

मातोश्रीवरील बैठकीला लोकसभेतील गजानन कीर्तिकर (मुंबई नॉर्थ वेस्ट),  अरविंद सावंत (मुंबई दक्षिण),  विनायक राउत (रत्नागिरी-सिंधुदुर्ग), धैर्यशील माने, (हातकणंगले),  हेमंत गोडसे (नाशिक),  राहुल शेवाळे (दक्षिण मध्य मुंबई),  श्रीरंग बारणे (पिंपरी-चिंचवड), प्रताप जाधव (बुलढाणा), सदशिव लोखंडे (शिर्डी) हे खासदार उपस्थित होते. राज्यसभेचे  संजय राऊत आणि  प्रियंका चतुर्वेदी या दोघांची हजेरी होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com