Rahul Gandhi News : आईस्क्रिमचे शौकिन, पण 'या' दोन भाज्या अजिबात आवडत नाहीत; वाचा, असे आहेत राहुल गांधी

एक कप कॉफीने राहुल गांधींच्या दिवसाची सुरुवात होते.
Rahul Gandhi News :
Rahul Gandhi News :Sarkarnama

Rahul Gandhi : कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. येत्या ३० जानेवारी रोजी या यात्रेचा समारोप होणार आहे. त्यांच्या या व्यस्त वेळापत्रकातही राहुल गांधी यांची एक भन्नाट मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. एका हिंदी युट्युब चॅनेलवर प्रसारित झालेल्या मुलाखतीत राहुल गांधी यांनी त्यांची ही पहिली नोकरी, पगार, त्यांना आवडणाऱ्या भाज्या, आवडता पदार्थ इथपासून ते आणि त्यांच्या आवडत्या ठिकाणांपर्यंत अनेक गोष्टींवर गप्पा मारल्या आहे. याचबरोबर त्यांनी त्यांच्या जीवनातील अनेक पैलुंविषयीही या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

- राहुल गांधींना दोन भाज्या अजिबात आवडत नाहीत

राहुल गांधी सांगतात, ''मला दोन भाज्या अजिबात आवडत नाहीत. मी सर्व काही खातो पण मला फणस आणि वाटाणे अजिबात आवडत नाहीत. आपण आहाराच्या बाबतीत मी खुप कडक आहे. त्यामुळे माझे जेवण कंटाळवाणे आहे. पण मी मांसाहारीही आहे. चिकन, मटण आणि सीफूड मला आवडते. पण मसालेदार किंवा खूप गोड पदार्थ आवडत नाहीत, असंही राहुल गांधींनी सांगितलं.

Rahul Gandhi News :
Kasba By Election : कसब्यातील निवडणुकीसाठी भाजप-काँग्रेस अॅक्शन मोडवर : बैठकांचा सपाटा; कोण असेल उमेदवार ?

याशिवाय, दुपारच्या जेवणासाठी काही देशी खाद्यपदार्थ आणि रात्रीच्या जेवणासाठी कॉन्टिनेंटल पदार्थ खायला आवडतात. याशिवाय तंदूरमध्ये बनवलेले पदार्थ आणि ऑम्लेटही राहुल गांधींच्या आवडीचे पदार्थ आहेत. एक कप कॉफीने राहुल गांधींची सकाळ सुरु होते. याशिवाय दिल्लीतील मोती महल, सागर आणि सर्वना भवन ही राहुल गांधींची आवडती रेस्टॉरंट्स आहेत. राहुल गांधींनाआईस्क्रीमही खायला आवडते. मी एकाच वेळी २ आईस्क्रिम खाऊ शकतो, असेही राहुल गांधी सांगतात.

- राहुल गांधींच्या प्रवासाची आवडती ठिकाणे

मोकळ्या वेळेत कुठे फिरायला जाता असे विचारले असता राहुल गांधींनी सांगितलं की, मोकळ्या वेळेत ते त्यांच्या मित्रांसोबत सायकलिंग करायला जातात. एखाद्या विशिष्ट पर्यटन स्थळाला भेट देण्यापेक्षा प्रवास करण्यात जास्त आनंद वाटतो. मला इतिहास आणि संस्कृतीमध्ये खूप रस आहे. त्या आधारे मी ठरवतो की मला कुठे जायचे आहे.

राहुल गांधी सांगतात, मला एकट्याने प्रवास करायला आवडते. अशा प्रवासात माझ्यासोबत सुरक्षारक्षकही नसतात. अनेकदा मी अशा सहलींना जात असतो. अशा वेळी आपण फक्त एक बॅग भरून प्रवासाला निघतो. युरोप, ब्रह्मदेश, स्पेन, इटली या देशांमध्ये आपण एकट्यानेच प्रवास केल्याचंही राहुल गांधी सांगतात.

- राहुल गांधींची पहिली नोकरी आणि पगार

राहुल गांधींना त्यांची पहिली नोकरी आणि त्यांच्या पगाराबाबत प्रश्न विचारण्यात आले. याबाबतही त्यांनी उत्तर दिलं. राहुल गांधी यांनी वयाच्या २५ व्या वर्षी पहिली नोकरी केली. लंडनमधील मॉनिटर नावाच्या कंपनीत सल्लागार म्हणून त्यांनी पहिली नोकरी केली. त्यावेळी त्यांना अडीच ते तीन हजार पाऊंड इतका पगार होता. पण तो पगार त्यावेळी त्यांचे घरभाडे आणि गरजेच्या गोष्टींमध्येच खर्च होत असे. भारतीय चलनात आजच्या घडीला ही रक्कम अडीच ते तीन लाखांपर्यंत जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com