चुलत्याला दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक; रोहित पाटील आबांच्या आठवणींनी भावनाविवश!

राजाराम पाटील हे सुमारे ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर गेल्या वर्षी पोलिस दलातून निवृत झाले आहेत. या कालाधीतील कामाची दखल घेऊन केंद्र सरकारकडून त्यांना दोन वेळा राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात आले आहे.
Bhagat Singh Koshyari-Rajaram Patil
Bhagat Singh Koshyari-Rajaram PatilSarkarnama

मुंबई : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा माजी गृहमंत्री (स्व.) आर. आर. पाटील (R.R. Patil) यांचे बंधू, पोलिस अधिकारी राजाराम पाटील हे गेल्या वर्षीच सेवानिवृत्त झाले. पोलिस दलातील त्यांच्या कामगिरीमुळे राजाराम पाटील यांना दोनवेळा राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पाटील यांना हे पदक प्रदान करण्यात आले. या पदक वितरणाच्या कार्यक्रमात आर. आर. आबांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील (Rohit Patil) यांना आबांची आठवण प्रकर्षाने जाणवली. त्याबाबत ट्विट करत रोहित पाटलांनी आबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. (R. R. Patil's brother Rajaram Patil awarded Presidential Medal for the second time)

Bhagat Singh Koshyari-Rajaram Patil
अशोक पवारांची व्यूहरचना यशस्वी ठरली आणि शिरूरमधून तिघे ‘कात्रज’मध्ये पोचले!

युवा नेते रोहित पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझे चुलते आदरणीय तात्यांच्या दुसऱ्या राष्ट्रपती पदक वितरण सोहळ्याला राजभवन मुंबई येथे आम्ही सर्वजण सहकुटुंब उपस्थित होतो. (स्व.) आबा गृहमंत्री असताना ज्यावेळेस पहिल्यांदा तात्यांचे नाव या पदकासाठी आले होते, त्यावेळेस आबा त्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून उपस्थित होते. पण, कधीकाळी फाटकी कपडे घालणारे भावंड एकाच कार्यक्रमात उपमुख्यमंत्री म्हणून आणि एक भाऊ पदक विजेता म्हणून उपस्थित असताना त्या दोन्ही मनाच्या भावना काय असतील, हा विचार आज कार्यक्रमाला उपस्थित राहताना आला. आजच्या कार्यक्रमाला आबांची प्रमुख उपस्थितीची उणीव आम्हा सर्वांसाठी अत्यंत भावनावश होती. पण, मानाचे पदक दुसऱ्यांदा मिळाले, याचा आनंददेखील आम्हा सर्वांना होता. आदरणीय तात्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा.

Rajaram Pati-R.R. Patil
Rajaram Pati-R.R. PatilSarkarnama
Bhagat Singh Koshyari-Rajaram Patil
पार्थ पवारांच्या निवडणूक लढविण्यावर रोहित पवार म्हणाले, मी कायम पार्थसोबतच..!

राजाराम पाटील हे सुमारे ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर गेल्या वर्षी पोलिस दलातून निवृत झाले आहेत. या कालाधीतील कामाची दखल घेऊन केंद्र सरकारकडून त्यांना दोन वेळा राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात आले आहे. यापूर्वी त्यांना २०१९ मध्ये हे पदक मिळाले होते. त्या पदक वितरणाच्या कार्यक्रमास तत्कालीन गृहमंत्री आर. आर. आबा उपस्थित होते. त्यानंतर यावर्षी दुसऱ्यांदा या पदकाचा मान राजाराम पाटील यांना मिळाला आहे.

राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते पाटील यांनी हा बहुमान स्वीकारला. या कार्यक्रमास संपूर्ण पाटील कुटुंबीय उपस्थित होते. मात्र, कमी होती ती आबांची. तीच उणीव रोहित पाटलांनी मोठ्या प्रकर्षाने जाणवली आणि सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी आपल्या भावांना वाट मोकळी करून दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com