'उद्धव ठाकरेंनी विधानसभेत जुन्या जखमांवरील खपल्या काढण्याची गरज नव्हती'

देशाच्या एकात्मतेला नजर लागली आहे. देश २०१४ पासून आठ पावले मागे गेला आहे.
Abu Azmi
Abu AzmiSarkarnama 

सोलापूर : देशाच्या एकात्मतेला नजर लागली आहे. देश २०१४ पासून आठ पावले मागे गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे देश विकत आहेत. पण, ‘मैं देश बिकणे नहीं दूंगा’ असे आव्हान समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार आबू आझमी (Abu Azmi) यांनी दिले. याच वेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत बाबरी मशीद शिवसैनिकांना पाडली, असे सांगून जुन्या जखमांवरील खपल्या काढण्याची आवश्यकता नव्हती, असे प्रतिपादन केले. (Prime Minister Narendra Modi is selling the country : Abu Azmi)

उस्मानाबाद दौऱ्यावर निघालेले आबू आझमी यांनी सोलापुरात शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. उद्घव ठाकरे यांनी हवे तर नवे नगर वसवावे आणि त्याला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे. मात्र, उस्मानाबाद आणि औरंगाबादचे नाव बदलून विनाकारण हिंदू-मुस्लिम असा वाद वाढवू नये, असेही त्यांनी सांगितले.

Abu Azmi
अभिजित पाटलांचा भालकेंना दणका; बारा कोटींच्या वसुलीसाठी ४०० जणांना नोटिसा

माझ्या पाठिंब्यामुळे ना सरकार वाचणार होते ना पडणार होते. मात्र, आम्ही महाविकास आघाडीला सेक्यूलर म्हणून पाठिंबा दिला होता. या कथित सेक्यूलर महाविकास आघाडीने अडीच वर्षांत मुस्लिम समाजासाठी काय केले. मौलाना आझाद महामंडळाची समिती गठीत केली नाही की हज कमिटीची स्थापना केली नाही, असा आरोपही आझमी यांनी केला.

Abu Azmi
शिवसेनेचा अखेर स्वबळाचा नारा; आदित्य ठाकरे लवकरच पुणे दौऱ्यावर!

देशात अनेक राज्यांतील विविध शहरांना मुस्लिम नावे आहेत. या सर्व शहरांची नावे बदली आहेत का, मग महाराष्ट्रात का बदलण्यात यावीत. ‘गेट ऑफ इंडिया’वर कोरलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या यादीत अनेक मुस्लिम स्वातंत्र्य सैनिकांची नावे कोण बदलू शकेल का, असे सवाल त्यांनी उपस्थित केले. देशाच्या संरक्षणासाठी ज्या निजाम सरकारने दान केले, सहाशे टन सोने दान केले. त्या शेवटच्या निजामाचे नाव खोडून काय मिळणार आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आबू आझमी म्हणाले...

  • हिजाबला विरोध करण्याचे कारण नाही

  • देशातील सामाजिक सलोखा बिघतोय

  • हिंदू- मुस्लिम यांच्यातील दरी वाढवली जात आहे.

  • भाजप सत्तेत येऊ नये, म्हणून दिला होता शिवसेनेला पाठिंबा

  • भाजप आरक्षण विरोधी आहे; हळूहळू सर्व आरक्षण बंद होणार

  • श्रीलंकेवर केवळ पाच हजार शंभर कोटी कर्ज होते; भारतावर १३६ लाख कोटी कर्ज

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com