Mohan Delkar-adv Atish Landge-Abhinav Delkar-KalabenDelkar
Mohan Delkar-adv Atish Landge-Abhinav Delkar-KalabenDelkarsarkarnama

शिवसेनेला राज्याबाहेर पहिला खासदार मिळवून देण्यात पिंपरीकरांचा सिंहाचा वाटा!

खासदार श्रीरंग बारणे व ॲड लांडगे यांच्यावर डेलकरांच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली.

पिंपरी : दादरा, नगर, हवेली या केंद्रशासित प्रदेशाच्या नवनिर्वाचित खासदार कलाबेन मोहनभाई डेलकर यांच्या रूपाने शिवसेनेला राज्याबाहेर पहिला खासदार ऐन दिवाळीत (ता. २ नोव्हेंबर) मिळाला. डेलकरांच्या विजयात पिंपरी-चिंचवडचा वाटा आहे, असे कोणी सांगितले, तर पटणार नाही. पण, ती वस्तुस्थिती आहे. डेलकर कुटुंबाचे फॅमिली फ्रेंड ॲड. अतिश लांडगे यांनी मोहन डेलकरांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या पत्नी, मुलाचा ऑक्टोबरमध्ये शिवसेनेत प्रवेश घडवून आणला. त्याच महिन्यात श्रीमती डेलकरांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली. त्याच महिन्यात ३० तारखेला झालेल्या निवडणुकीत त्या विजयी झाल्या आणि शिवसेनेला महाराष्ट्राबाहेर पहिला खासदार मिळाला. यानिमित्ताने दादरा, नगर, हवेलीवरचा डेलकर कुटुंबाचा वरचष्माही कायम राहिला आहे. (Pimpri connection to the victory of Delkar, the first Shiv Sena MP from outside maharashtra)

डेलकर यांच्या पत्नी कलाबेन व मुलगा अभिनव यांचा शिवसेना प्रवेश पिंपरीतील ॲड लांडगे यांनी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यामार्फत घडवून आणला नसता, तर शिवसेनेचा राज्याबाहेर पहिला खासदार झाला नसता, असे म्हटले, तरी ते वावगे ठरणार नाही. खासदार बारणे हेही कलाबेन यांच्या प्रचारासाठी दोन दिवस दादरा, नगर, हवेलीत जाऊन आले होते. मराठी भाषिक भागात त्यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या. तेथील वातावरण पाहून कलाबेन नक्की निवडून येतील, असे भाकितही त्यांनी मतदानापूर्वीच (ता.२४ ऑक्टोबर) ‘सरकारनामा’शी बोलताना व्यक्त केले होते, त्यामुळे शिवसेनेचा राज्याबाहेर पहिला खासदार होण्यासाठी पिंपरी-चिंचवडनेही वाटा उचलला आहे.

Mohan Delkar-adv Atish Landge-Abhinav Delkar-KalabenDelkar
वानखेडेंना क्लिनचिट देणाऱ्या हलदरांचाच फर्जीवाडा! मलिकांनी टाकला बॉम्ब

मोहन डेलकर हे सातवेळा दादरा, नगर, हवेलीतून निवडून आले होते. तेथील प्रशासक प्रफुल पटेल व इतर अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी मुंबईत या वर्षी फेब्रुवारीत आत्महत्या केली होती. त्यांची बीएची पदवी पुणे विद्यापीठाची आहे, त्यासाठीचे शिक्षण त्यांनी पिंपरी-चिंचवडमधील डॉ. डी. वाय पाटील कॉलेजमध्ये घेतले. तेथे त्यांची ॲड. लांडगे यांच्याशी ओळख झाली. नंतर तिचे रुपांतर घट्ट मैत्रीत झाले. ते एकमेकांचे फॅमिली फ्रेंड बनले. डेलकरांना पुणे विद्यापीठाचे खूप आकर्षण होते, त्यातून त्यांनी महाराष्ट्राबाहेर पुणे विद्यपीठाचे पहिले कॉलेज दादरा नगर हवेलीत सुरू केले. त्यानिमित्त डेलकर पुण्याला ॲड लांडगे यांच्याकडे येत असत. दोन वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवडच्या ५० वकिलांची सहलही दादरा नगर हवेली, तसेच दमणला गेली होती. तेव्हा या वकिलांचे आदरातिथ्य मोहन डेलकर यांनी केले होते.

Mohan Delkar-adv Atish Landge-Abhinav Delkar-KalabenDelkar
भाजप आमदारांच्या निधीतल्या सभागृहाच्या भूमिपुजनाला शिवसेना नेत्याचे हात

डेलकर कुटुंबाचा शिवसेना प्रवेश व उमेदवारीबाबत ॲड लांडगे म्हणाले की, खासदार असतानाच डेलकरांनी आत्महत्या केली, त्यामुळे पोटनिवडणूक लागली. सहानूभुतीच्या लाटेचा फायदा होईल; म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारीची ऑफर डेलकर परिवाराला दिली होती. पण, राष्ट्रवादी कॉंग्रेस वा शिवसेनेकडूनच त्यांना निवडणूक लढवायची होती. पण, नक्की कोणत्या पक्षातून निवडणूक लढवायची या संदर्भात मोहन डेलकरांचे चिरंजीव अभिनव व त्यांचे पीए म्हणून काम पाहिलेले पंकज शर्मा यांनी मला संपर्क केला. आमच्या चर्चेतून शिवसेनेतून लढण्याचे नक्की झाले. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता मावळचे खासदार बारणे यांच्याशी संपर्क साधला. त्यांना सर्व हकीकत व परिस्थिती सांगितली. त्यावर खासदार बारणेंनी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत व पक्षाचे सचिव, खासदार अनिल देसाई यांना गाठले.

Mohan Delkar-adv Atish Landge-Abhinav Delkar-KalabenDelkar
रावसाहेब दानवेंनी इंग्रजीत बोलणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्याची अशी जिरवली..

उमेदवारी अर्ज भरण्यास दोन दिवस राहिले असताना खासदार बारणे यांचा फोन आला. अतिश, मी सर्व माहिती राऊत आणि देसाईसाहेबांना सांगितली आहे. पण, अजून काही मातोश्रीवरून आदेश आला नाही, असे त्यांनी सांगताच क्षणभर हताश झालो होतो. तेवढ्यात दुपारी साडेबारा वाजता खासदार बारणेंचाच फोन आला. संध्याकाळी पाच वाजता मुंबईतील ग्रॅंड हयात हॉटेलमध्ये खासदार राऊत यांनी मिटींगसाठी बोलावल्याचे त्यांनी सांगितले. त्या बैठकीत खासदार राऊत यांनी शिवसेना पूर्णपणे डेलकर कुटुंबाच्या पाठीमागे उभी राहील, असा शब्द दिला. दुसऱ्याच दिवशी डेलकर मायलेकांचा शिवसेनेत प्रवेश झाला. त्यानंतर कलाबेन यांना उमेदवारीही जाहीर करण्यात आली.

खासदार श्रीरंग बारणे व ॲड लांडगे यांच्यावर डेलकरांच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी व राज्यातील शिवसेनेचे दहा खासदार, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल देसाई यांनी जातीने लक्ष घातले. कलाबेन मोठ्या फरकाने विजयी झाल्या आणि शिवसेनेने महाराष्ट्राबाहेर सीमोल्लंघन साजरा केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com