अटक झाली तरी ‘हर हर महादेव’विरोधातील लढाई चालूच राहणार : आव्हाडांच्या पत्नीचा निर्धार

आमची ही लढाई यापुढेही चालूच राहणार आहे. त्याचे मार्ग काहींसे बदलतील. पण, ही लढाई थांबवणार नाही.
Ruta Awhad
Ruta AwhadSarkarnama

ठाणे : ‘हर हर महादेव’ चित्रपटातील कथानकाच्या विरोधात आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि काही संस्था लढाई लढत आहेत. इतिहासाचा विपर्यासाला विरोध केल्यानंतर आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. मात्र, आमची ही लढाई यापुढेही चालूच राहणार आहे. त्याचे मार्ग काहींसे बदलतील. पण, ही लढाई थांबवणार नाही. या चित्रपटातील इतिहासाच्या विपर्यासाला आमचा विरोध कायम राहणार आहे, असे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड (Ruta Awhad) यांनी स्पष्ट केले. (Our opposition to Har Har Mahadev movie will continue : Ruta Awhad)

हर हर महादेव चित्रपटाच्या माध्यमातून जो चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. त्याचा परिणाम कळत न कळत तो खूप खोलवर हेात असतो. त्यामुळे कधीही ऐतिहासिक सिनेमे बारकाईने आणि संशोधनपूर्ण बनविणे गरजेचे आहे. हर हर महादेव चित्रपटातील कथानकाच्या विरोधात जितेंद्र आव्हाड आणि काही संस्था लढाई लढत आहेत. ही लढाई चालूच राहणार आहे. त्याचे मार्ग काहींसे बदलतील. पण ही लढाई थांबवणार नाही. मात्र, या चित्रपटातील इतिहासाच्या विपर्यासाला आमचा विरोध कायम राहणार आहे.

Ruta Awhad
मोठी बातमी : आव्हाडांनी नाव घेतलेल्या डीसीपी राठोडांची तडकाफडकी बदली

जितेंद्र आव्हाड यांना अटक करताना पोलिसांची जी हतबलता बघितली. तेव्हा खूप आश्चर्य वाटलं. एखाद्या अदखलपात्र गुन्ह्याला दखलपात्र गुन्हा बनविण्यासाठी पोलिसांवर कसा प्रेशर होतं आणि कोणीही असं म्हणत नाही की मी हे केलं. त्यामुळे स्पष्टीकरण देण्याची त्यांनाही गरज नाही. जे काही झालं आणि घडलं आहे, ते सर्वांना माहिती आहे. तसेच, ते करणाऱ्यांनाही माहिती आहे आणि भोगणाऱ्यालाही माहिती आहे.

Ruta Awhad
जामीन मिळताच आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया : ‘चाणक्य’ची नीती फसली...

न्यायालयाने आज जो काही निर्णय दिला आहे, त्याबद्दल मी कोर्टाचे आभार मानते. त्याचबरोबर, ज्येष्ठ नेते शरद पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्यासह कार्यकर्ते जितेंद्र आव्हाड यांच्या पाठीशी उभे राहिले. या उत्साही पाठिंब्यामुळे कुठच्याही नेत्याला पुन्हा काम करण्याची ऊर्जा निर्माण होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in