Atul Bhatkhalkar News
Atul Bhatkhalkar NewsSarkarnama

2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतरही शिंदे मुख्यमंत्री असतील का? अतुल भातखळकर म्हणतात...

Atul Bhatkhalkar News : सरकारनामाच्या ओपन माईक या कार्यक्रमात अतुल भातखळकर यांनी मांडले स्पष्ट मत

Atul Bhatkhalkar News : शिवसेनेमध्ये बंड करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजप सोबत सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे शिंदे सरकार किती काळ टिकणार यावरुन नियमीत चर्चा होत असते. तसेच 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील का? असा सवाल अनेकदा विचारला जातो. याच प्रश्नावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे.

'सरकारनामा ओपन माईक' सिजन 2 या कार्यक्रमात अतुल भातखळकर बोलत होते. या वेळी काँग्रेस नेते सत्यजित तांबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari), बाळासाहेबांची शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद, मनसे नेते संदीप देशपांडे, शिवसेना (Shivsena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आमदार मनिषा कायंदे उपस्थित होत्या.

Atul Bhatkhalkar News
काँग्रेस सोडणार का? सत्यजीत तांबेंचे भन्नाट उत्तर

2024 मध्ये शिंदे मुख्यमंत्री असतील का, आणि भाजपला ते चालतील का? असा प्रश्न भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांना विचारण्यात आला होता. राजकारणात कसलेल्या भातखळकरांनी आपली कोंडी होऊ न देता विरोधकांचीच फिरकी घेतील. ते म्हणाले, तुम्ही मानले की शिंदे आणि भाजपचे सरकार 2024 मध्येही येईल.

2024 पर्यंतचा कालावधी हे सरकार यशस्वीपणे पूर्ण करेल. विधानसभा निवडणुकीनंतर शिंदे गट किती जागा आणि भाजप किती जागा लढणार त्यावर अवलंबून असेल. पुन्हा शिंदेंनाच मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केले जाईल का-आज ते सांगता येत नाही. कारण आता सुखाने संसार सुरू आहे. राहिलेली कामे पूर्ण करणार आहे, असे आश्वासन भातखळकर यांनी दिले.

तसेच यावेळी भातखळकर यांनी नोटबंदीवरही भाष्य केले. ते म्हणाले, नोटबंदीमुळे देशातले डिजीटल व्यवहार वाढले. मात्र, विरोधक टिका करतात. नोटबंदीमुळे ब्लॅक मनी व्हाईट झाला आहे. नोटबंदी काळ्या पैशाच्या विरोधातील एकमेव उपाय नव्हता. अनेक उपयांपैकी एक होता. लोकांनी नोटबंदी स्विकारली आहे.

Atul Bhatkhalkar News
पुन्हा जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात लढणार का? दिपाली सय्याद यांनी स्पष्टच सांगितले

'सरकारनामा'चा विशेष कार्यक्रम 'ओपन माईक सिजन 2' लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमात नेत्यांनी एक मेकांना चांगल्याच कोपरखळ्या मारल्या. तसेच अडचणीचे प्रश्न विचारुन कोंडीही केली. तर हास्यविनोद करत कार्यक्रमात रंगत आणली. या कार्यक्रमात नेत्यांनीच नेत्यांना प्रश्न विचारले. त्यावर त्यांची धमाल उत्तरे दिली. तसेच एकमेकांना चांगलेच चिमटेही काढले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com