तृप्तीच्या कुटुंबाचा विरोध गृहीत धरला होता...पण मी नशिबवान निघालो!

‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी व्यक्त केल्या आपल्या प्रेमाच्या भावना
Umesh Patil-Trupti Patil
Umesh Patil-Trupti PatilSarkarnama

उमेश पाटील

सोलापूर : ‘व्हॅलेंटाईन डे’च्या (Valentine's Day) सर्वांना मनापासून शुभेच्छा... जगभरातील तरुण-तरुणींचा प्रेमाचा उत्सव किंवा प्रेमाचा सण म्हणून या दिवसाचं आगळेवेगळे महत्त्व आहे. एका विशिष्ट वयामध्ये विशिष्ट परिस्थितीमध्ये आपलं सर्वस्व अर्पण करावं, अशी आंतरिक भावना मनामध्ये निर्माण होऊ शकते. चांगलं काय वाईट काय? या विचारविश्वाच्या द्वंद्वापलीकडे जाऊन मनातील भावनांचा उत्कट अविष्कार म्हणजे प्रेम. प्रेमात पडल्यावर एका कुठल्यातरी क्षणी, उत्कट आवेग निर्माण होऊन प्रेमभावना व्यक्त करण्याचे धाडस ज्या दिवशी तरुण-तरुणी करतात तो दिवस त्यांच्यासाठी ‘व्हॅलेंटाईन डे’ असतो. ता. १४ फेब्रुवारीचा दिवस म्हणजे त्या निसर्गदेवतेने फक्त मनुष्याला दिलेल्या दैवी प्रेम भावनांची आठवण पुन्हा ताजी करणारा दिवस; म्हणून आपण तो दिवस साजरा करतो. लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ‘लग्न’ झालेलं असणं ही एकमेव अट असते. परंतु ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यासाठी ‘लग्नाची’ अट नसते. (On the occasion of 'Valentine's Day', Umesh Patil expressed his feelings of love)

वयाच्या एका विशिष्ठ टप्प्यावर ‘करीअर की प्रेम’ हे द्वंद्व अनेकांच्या वाट्याला येते. परंतु प्रेमामध्येसुद्धा जे लोक सावध असतात, ते या द्वंद्व युद्धात विजयी होतात.प्रत्येक वेळी प्रेमाची परिणीती लग्नातच होतेच असं नाही. काही वेळा लग्न न करण्याचा निर्णय किंवा जोडीदाराच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेमाच्या त्यागाचा घेतलेला निर्णयदेखील खऱ्या जबाबदार प्रेमाचा निर्णायक परिणाम असतो. लग्न झाले नाही म्हणजे प्रेम अपयशी होत नाही. आपल्या प्रेयसीवर वेड्यासारखे प्रेम करणे नैसर्गिक आहे; परंतु प्रेमासाठी वेडे होणे व्यवहारीक जगात परवडणारे नाही व शहाणपणाचेदेखिल नाही.

Umesh Patil-Trupti Patil
यड्रावकर सेनेला शिरोळमधून हद्दपार करा : शिवसेना कोट्यातील राज्यमंत्र्यांवर जिल्हाप्रमुखांचा हल्लाबोल

अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियाच्या जगात प्रेमाची संकल्पना मात्र बदलत चालली आहे. आजकालच्या तरुण-तरुणींना स्वतःच्या आयुष्याबद्दल, स्वतःच्या करिअरबद्दल गांभीर्य नसल्याचे जाणवत आहे. जे तरुण-तरुणी स्वतःच्या करिअरबद्दल गंभीर नसतात, ते स्वतःच्या प्रेमाबद्दलही गंभीर नसतात. असे माझे ठाम मत आहे. ज्याच्यावर किंवा जिच्यावर आपले मनापासून प्रेम आहे, त्याच्यासोबत या व्यवहारीक जगात आपण सुखी जीवन जगू शकू, अशी शाश्वत परिस्थिती निर्माण करण्याची धमक नसेल तर त्यांनी एकतर प्रेम करू नये आणि करायचेच असेल तर कुठच्याही परिस्थितीत केवळ प्रेमाच्या लढाईत नव्हे तर आयुष्याच्या लढाईत देखील यशस्वी होण्याची इर्षा असेल तर आणि तरच प्रेम करून लग्नाचा निर्णय घ्यावा.

Umesh Patil-Trupti Patil
सहलीवर गेलेल्या नगरसेविकेचे हृदयविकाराने निधन; भाजपच्या सत्तेच्या मोहिमेला मोठा धक्का

माझे व तृप्तीचे (राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजय कोलते यांची कन्या) प्रेम हे सावधपणे केलेले; परंतु तेवढेच उत्कट होते. प्रेमात यशस्वी व्हायचे असेल तर आधी आयुष्यात यशस्वी होणे गरजेचे आहे, ही आमची ठाम भूमिका होती. मी एक सामान्य कुटुंबातील तरुण व तृप्ती एका मंत्री दर्जाच्या बड्या राजकीय नेत्याची मुलगी. आम्हाला वस्तुस्थितीचे भान होते. तृप्तीच्या कुटुंबातून विरोध होऊ शकतो, हे मी गृहीत धरले होते आणि ते साहजिकही होते, त्यामुळे मला माझी योग्यता सिद्ध करणे गरजेचे होते. त्यातूनच आम्ही दोघांनीही करिअरला प्राधान्य दिले. तृप्तीला शासकीय नोकरी लागली. किमान एक बाजू भक्कम असेल तर घेतलेला निर्णय निभावून नेऊ शकू, याची खात्री पटल्यावर आम्ही आपापल्या घरी विचारणा केली. तृप्तीच्या कुटुंबीयांचे आभार मानावे, तेवढे कमी आहेत; कारण मला नोकरी नसताना माझ्यावर विश्वास ठेऊन त्यांनी आमच्या लग्नाला होकार दिला.

Umesh Patil-Trupti Patil
उमेदवारी नाकारल्याने ३० वर्षे संचालक असलेल्या ढमढेरेंचा राष्ट्रवादीविरोधातच शड्डू!

मुलीच्या आवडीचा व निर्णयाचा आदर करण्याचा उमदा विचार सर्वच पालक करतात, असे नाही. या बाबतीत मी नशीबवान ठरलो. याचा अर्थ प्रत्येकाच्या वाट्याला असे नशीब येईलच, असे नाही, त्यामुळे प्रेमात यशस्वी व्हायचे असेल तर आयुष्यातील स्थैर्याचा विचार आधी करायला हवा. त्याची खात्री असेल तरच पुढे जावे; अन्यथा पश्चाताप कितीही केला तरी, उसवलेले आयुष्य कपडे शिवता येतात, तसे पुन्हा शिवता येत नाही, हे लक्षात ठेवावे. तृप्ती शासकीय नोकरीत असल्याने मला माझ्या आवडीच्या क्षेत्रात करीअर करता आले. व्यवसायात जम बसवता आला. आम्ही करीअर सोडून फक्त प्रेमाचा विचार केला असता तर आमचे प्रेम यशस्वी झाले नसते, ही बाब आजच्या काळातील तरुण तरुणींनी लक्षात घ्यावी.

(लेखक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि सोलापूर जिल्ह्याचे पक्षाचे कार्याध्यक्ष आहेत)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com