लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मला माझ्या विठ्ठलाचे दर्शन झाले : पवारांनी खुर्चीवर बसवलेल्या जाधवांची भावना

पवारसाहेबांनी आणि पक्षाने मला तालुकाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली, हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट होती.
Sharad Pawar-Pushkar Jadhav
Sharad Pawar-Pushkar JadhavSarkarnama

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मला खुर्चीवर नेऊन बसविले, त्याबाबतच्या भावना शब्दांत मांडता न येणाऱ्या आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मला साक्षात माझ्या विठ्ठलाचे दर्शन झाले, अशा शब्दांत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP) पुरंदर (Purandhar) तालुकाध्यक्ष पुष्कर जाधव (Pushkar Jadhav) यांनी आपल्या भावना मांडल्या. (On the day of Lakshmi Poojan I meet my Vitthal : Pushkar Jadhav)

ज्येष्ठ नेते शरद पवार हे सोमवारी (ता. २४ ऑक्टोबर) पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. परिंचे येथे शेतकरी मेळावा झाल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुरंदर तालुकाध्यक्ष पुष्कर जाधव हे पवार यांना घेऊन विभागीय कार्यालयात आले. तेव्हा जाधव यांनी पवारांना खुर्चीवर बसण्याची विनंती केली. मात्र, शरद पवार यांनी ‘ऑफीस तुमचं, खुर्ची तुमची’ असे सांगून जाधव यांना खुर्चीवर नेऊन बसविले. खुद्द पवारांनी खुर्चीवर बसविल्याने त्याची चर्चा सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याबाबत ‘सरकारनामा’शी बोलताना जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Sharad Pawar-Pushkar Jadhav
मंत्रिमंडळ विस्तार ठरला; राज्यमंत्र्यांचाही शपथविधी होणार : फडणवीसांची माहिती

जाधव म्हणाले की, पवारसाहेब १९९३ नंतर पुरंदर तालुक्याच्या दक्षिण भागात आले हेाते. तेही मी राष्ट्रवादी युवकचा अध्यक्ष असताना त्यामुळे साहेब आमच्या भागात आले, याचा मोठा आनंद होता. मी एका सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे. पवारसाहेबांनी आणि पक्षाने मला तालुकाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली, हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. राज्यात आज अनेक कार्यकर्ते पवारांचा आशीर्वाद मिळावा, यासाठी धडपडत असतात. पण, मला खुद्द साहेबांंनीच खुर्चीवर नेऊन बसविले, हे मी माझे भाग्य समजतो.

Sharad Pawar-Pushkar Jadhav
बंद पडलेले ‘व्हॉट्‌स ॲप’ भारतात दोन तासानंतर सुरू झाले

पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे पाय आमच्या कार्यालयाला लागतील, असे कधीही वाटलं नव्हतं. मात्र, शेतकरी मेळावा संपल्यानंतर मी पवारसाहेबांना कार्यालयात येण्याची विनंती केली. त्यानुसार ते कार्यालयात आले, पक्षाचे राष्ट्रीय असल्याने मी त्यांना खुर्चीवर बसण्याची विनंती करत होतो. मात्र, त्यांनी मला खुर्चीवर बसवत माझाच सन्मान केला. या सर्व गोष्टी अनपेक्षितपणे घडत गेल्या, त्यामुळे साहेबांच्या प्रेमामुळे माझा ऊर आनंदाने भरून आला होता, असेही पुष्कर जाधव यांनी नमूद केले.

Sharad Pawar-Pushkar Jadhav
मनसे आमदाराने युतीचे संकेत देताच श्रीकांत शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट!

पवारसाहेबांचे महाबळेश्वरमधील ते वाक्य आठवले

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अधिवेशन काही महिन्यांपूर्वी महाबळेश्वरमध्ये झाले होते. त्यावेळी पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी युवक पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले हेाते. पक्षाचे अध्यक्ष या नात्याने शरद पवार यांनीही आम्हाला त्या अधिवेशनात मार्गदर्शन केले होते. त्यावेळी त्यांनी खुर्ची सहजासहजी मिळत नसते तर ती खेचून घ्यावी लागते, असे म्हटले होते. मात्र, त्यांनीच मला खुर्ची दिली, हे माझे भाग्य समजतो, अशी आठवणही पुष्कर जाधव यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com