पार्थ पवारांच्या निवडणूक लढविण्यावर रोहित पवार म्हणाले, मी कायम पार्थसोबतच..!

झोमॅटोच्या दहा मिनिटांत फूड डिलिव्हरीबाबत रोहित पवार यांनी ट्विट करत प्रश्न उपस्थित केला आहे.
Rohit & Parth Pawar
Rohit & Parth PawarSarkarnama

मुंबई : पार्थ पवार (Parth Pawar) यांनी निवडणूक लढवावी, ही फक्त सोशल मीडियावर चर्चा आहे. पार्थ पवार हे याबाबत अजून काहीही बोलले नाहीत. ही फक्त अफवा असेल, तर त्यात का लक्ष घालावे? पण, निवडणूक लढविण्याबाबतचे काही प्रपोजल आले, तर पार्थ यांच्यासोबत मी तेव्हाही होतो, आजही आहे आणि भविष्यातही कायम राहीन, असे पार्थ पवार यांचे बंधू आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी स्पष्ट केले. (On contesting Parth Pawar's election, Rohit Pawar said, I always with Parth...)

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी पार्थ पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त एक फेसबूक पोस्ट लिहिली होती. त्यात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पार्थ पवारांना मावळ द्यावा आणि खासदार श्रीरंग बारणे यांना राज्यसभेत पाठवावे, अशी मागणी केली होती. त्यासंदर्भाने आमदार रोहित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी वरील उत्तर दिले.

Rohit & Parth Pawar
करवसुलीसाठी प्रशासक कठोर; लांडगेंच्या मतदारसंघातील चिखलीत सर्वाधिक मिळकती जप्त

रोहित पवार म्हणाले की, पार्थ पवार यांनी निवडणूक लढवण्याबाबतची चर्चा फक्त सोशल मीडियावर सुरू आहे. स्वतः पार्थ यांनी याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही. ही फक्त अफवाच असेल तर त्यात आपण का लक्ष घालावे, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. दरम्यान, पार्थ पवार यांनी मागील लोकसभेची निवडणूक ही राष्ट्रवादीकडून मावळ मतदारसंघातून लढवली होती. त्या निवडणुकीत शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून पार्थ यांचा पराभव झाला होता. त्यानंतरही त्यांनी मावळात काम सुरूच ठेवले आहे.

Rohit & Parth Pawar
फडणवीसांचा बैलगाडा ठरला फायनलसम्राट; बैलाची किंमत ऐकून विरोधी पक्षनेतेही अवाक्‌!

झोमॅटोच्या दहा मिनिटांत फूड डिलिव्हरीबाबत रोहित पवार यांनी ट्विट करत प्रश्न उपस्थित केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारी मुले हे गरीब कुटुंबातील, विद्यार्थी असतात. केवळ १० मिनिटांत फूड डिलिव्हरी देण्याची झोमॅटोची सेवा म्हणजे या मुलांच्या जीवाशी खेळ आहे. अशी सेवा देण्यापूर्वी कंपनीने डिलिव्हरी बॉयच्या संपूर्ण सुरक्षेची काळजी घेणं आणि त्यांना विमा कव्हर देणं महत्त्वाचं आहे.

Rohit & Parth Pawar
राणेंना उच्च न्यायालयाचा दिलासा; अनधिकृत बांधकामप्रकरणी कारवाई न करण्याचे निर्देश

त्यांनी पुढे म्हटले आहे की, केवळ 10 मिनिटांत खरंच फूड डिलिव्हरी होऊ शकते का? तर 10 मिनिटांत डिलिव्हरी करणे शक्य नाही. यामध्ये एखादी घटना घडली तर त्या डिलिव्हरी बॉयचे कुटूंब अडचणीत येऊ नये. मुलांच्या जीवाशी कुणीही खेळू नये. याबाबत संबंधित मंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही चर्चा करू. हा विषय जर केंद्रांचा असेल तर त्यांच्याशीदेखील बोलू.

Rohit & Parth Pawar
जयश्री जाधवांच्या विजयाची जबाबदारी शिवसेनेची; कामाला लागा : ठाकरेंचा क्षीरसागरांना आदेश

पत्रकारांना आरोग्य योजनेतून मदत करता येईल का? याबाबतच विषयही रोहित पवार यांनी मांडला. ते म्हणाले की कोरोना काळात पत्रकार अडचणीत होते, ती अडचण पुन्हा होऊ नये, यासाठी त्यांच्या आरोग्याबाबतचा प्रश्न मी विधानसभेत उपस्थित केला. एसटीच्या संपाबाबत रोहित पवारांनी सांगितले की, एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आम्ही सर्वजण संवेदनशील आहोत. आत्महत्या हा मार्ग असू शकत नाही. आम्ही कर्मचाऱ्यांसोबत आहोत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com