
कुडाळ : जावळी तालुक्यातील सनपाने गावच्या शेतकरी कुटुंबातील ओंकार मधुकर पवार (Omkar Madhukar Pawar) यांनी अत्यंत सामान्य परिस्थितीतुन सन 2021-22 मध्ये झालेल्या भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा परीक्षेत (UPSC) देशात १९४ रँक मीळवून जावलीतील पहिला आयएएस (IAS) अधिकारी होण्याचा बहुमान मिळवला आहे. त्याच्या या यशाचे सर्व स्तरातून भरभरून कौतुक होत असून त्याच्या यशाने जावळीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
जावळी हा डोंगरी दुर्गम विभाग म्हणून ओळखला जातो, याठिकणी छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा आहे. येथील माणसे गरीब,कष्टाळू.या मातीला गुवत्तेचा सुवास आहे. याच तालुक्यातील सनपाने येथील ओंकार पवार याने जिद्द,चिकाटी आणि अथक परिश्रमच्या जोरावर यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळवले आहे.
ओंकार हा मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील. त्याचे वडील मधुकर पवार हे करहर येथे फोटोग्राफीचा व्यवसाय करतात आणि आई नीलिमा पवार या शेतीकाम करतात. ओंकार याला दोन बहिणी असून एक बहीण कला क्षेत्रात करिअर करत असून लहान बहीण ओंकार च्या मार्गदर्शनानुसार ती सुद्धा यूपीएससीचा अभ्यासक्रम करीत आहे.
ओंकार याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या सनपाने शाळेत ,माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कुल हुमगाव तर कराड व पुणे याठिकणी येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतानाच त्याने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली.शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कंपनीत चांगल्या नोकरीचा स्वीकार न करता स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात सातत्य ठेवले.
यामध्ये पहिल्याच प्रयत्नात त्याची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या असिस्टंट कमांडर इन पॅरामिलिटरी फोर्स या पदासाठी निवड झाली. यानंतरही त्यांनी आपला अभ्यास नियमित सुरूच ठेवला होता.नुकतेच तीन महिन्यांपूर्वी ते आयपीएस म्हणून हैद्राबाद या ठिकणी रुजू झाले होते.मात्र आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते.यामुळे त्याच्यातील जिद्द ,आकांशा त्याला यासाठी शांत बसू देत नव्हती. चिकाटी आणि कष्टाने त्याच्या अथक परिश्रमाने त्यांनी आयएएस होण्याचे स्वप्न आज साकार केले आहे.
`मुलाने कष्टाचे चीज केले`
ग्रामीण भागात राहून आयुष्यभर शेती व फोटोग्राफी चा व्यवसाय करून मुलांना शिकवले, आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही केवळ स्वतःच्या हिमतीवर व मेहनतीने मुलाने एवढे मोठे यश मिळवून गावचे व तालुक्याचे नाव उजवल केले त्याचा सार्थ अभिमान वाटत असून, आजपर्यंत च्या कष्टाचे पोराने चीज केले.
अभ्यासात सातत्य ठेवले व कठोर परिश्रम घेतले तर कोणत्याही परीक्षेत यश मिळविणे कठीण नसते. कोणत्याही परीक्षेची तयारी करताना यशस्वी विद्यार्थ्यांचे अनुभव जाणून घेऊनच तयारीला सुरुवात करावी.' तसेच ग्रामीण भागातील मुलांनी जास्तीत जास्त स्पर्धा परीक्ष साठी उतरले पाहिजेत, असे ओंकारने सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.