Shivsena News : ‘उद्धव ठाकरेंची साथ सोडा अन॒ आमच्याकडं या; २० कोटींचा फंड देतो : शिवसेनेच्या ४ नगरसेवकांना ऑफर’

सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चंदगडमध्ये सत्ता आणली आहे.
Vijay Devane
Vijay Devane Sarkarnama

कोल्हापूर : चंदगडमधील शिवसेनेच्या (Shivsena) चार नगरसेवकांना फोडण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून झाला. त्यासाठी त्यांना २० कोटींची ऑफर अर्थात निधी देतो. उद्धव ठाकरेंची साथ सोडा आणि आमच्याकडे या, अशी ऑफर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून देण्यात आली होती. मात्र, आमच्या निष्ठावंत शिवसैनिकांनी ती ऑफर नाकारली, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी कोल्हापुरात बोलताना केला. (Offer of 20 crores to four corporators of Shiv Sena for entry into Shinde group: Vijay Devane)

देवणे म्हणाले की, सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चंदगडमध्ये सत्ता आणली आहे. पाटील पालकमंत्री असताना ऋतुराज पाटील यांनी चंदगडला पाच कोटी रुपये दिले होते. मात्र, आमचे नगरसेवक सांगत होते की एकनाथ शिंदेंनी आम्हाला २० कोटींची ऑफर दिली आहे. आमच्याकडे या, असे ते सांगत होते. आता कोटी आणि खोक्याशिवाय बोलायचंच नाही.

Vijay Devane
Old Pension Scheme : आमदारांची पेन्शन रद्द करा; पण कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा : आमदार विक्रम काळे आक्रमक

वीस कोटी रुपयांचा निधी देतो. उद्धव ठाकरेंची साथ सोडा आणि आमच्याकडे या, अशी ऑफर आमच्या चार नगरसेवकांना मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून देण्यात आली होती. चंदगडमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सत्ता आहे. पण आमच्या निष्ठावंत शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांना चांगले उत्तर दिले. ते म्हणाले की, तुम्हा आम्हाला २० कोटींचा निधी द्याल. पण पुढे तुरूंगात टाकले तरी सतेज पाटील, विजय देवणे येणार नाहीत, त्यामुळे तुमचे २० कोटी रुपये आम्हाला नको, असे त्या चार नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांना ठणकावून सांगितले.

Vijay Devane
Thackeray on Konkan Tour : उद्धव ठाकरेंनी कदमांच्या ‘होम ग्राउंड’वरील सभेची जबाबदारी दिली ‘या’ दोन मोठ्या नेत्यांवर!

देवणे म्हणाले की, पालकमंत्री सतेज पाटील सहा महिन्यांपूर्वी गाडीत होते. ते आता उन्हा-तान्हात आहेत. आमचं सारं आयुष्यच उन्हात गेलेले आहे, त्यामुळे ऊन पावसाची आम्हाला तमा नाही. हे ४० चोरांचे सरकार आहे. देश अंबानी-अदाणी चालवत आहेत. गेंड्याच्या कातडीचे हे सरकार आहे. त्यांच्यावर तुटून पडल्याखेरीज पर्याय नाही. जुनी पेन्शनसाठी सभागृह बंद पाडावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com