आता माझ्याजवळ अजितदादा नावाचं सुप्रीम कोर्ट आहे : सतीश काकडे

आतापर्यंत मी सोमेश्वर साखर कारखान्याचं कामकाज पटलं नाही, तर हायकोर्टात जायचो.
आता माझ्याजवळ अजितदादा नावाचं सुप्रीम कोर्ट आहे : सतीश काकडे
Ajit Pawar-Satish KakadeSarkarnama

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : ‘‘मी आहे तोवर शेतकरी कृती समिती अजितदादा पवार यांच्याच पाठीशी उभी राहील. आतापर्यंत मी सोमेश्वर साखर कारखान्याचं कामकाज पटलं नाही, तर हायकोर्टात जायचो. पण, आता माझ्याजवळ अजितदादा नावाचं सुप्रीम कोर्ट आहे. त्यामुळे माझ्या मुलाला जरी संचालक मंडळात घेतलं असलं तरी काही चुकीचं वाटलं तर मला अडचणी मांडायला सुप्रीम कोर्ट आहे, असा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचे कौतुक करत चुकीचं काम करणाऱ्यांना कृती समितीचे प्रमुख सतीश काकडे यांनी एक प्रकारे इशारा दिला आहे. (Now I have a Supreme Court named Ajit Dada : Satish Kakade)

बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गव्हाणपूजन व गाळप हंगाम शुभारंभ कार्यक्रम उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. त्यात सतीश काकडे बोलत होते. ते म्हणाले की, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यातील पदाधिकाऱ्याचे चुकीचं काम वाटलं तर मी थेट उच्च न्यायालयात जात होतो. पण, आता मला कोर्टात जाण्याची गरज नाही. कारण अजितदादा नावाचं सुप्रीम कोर्टच आता माझ्याजवळ आहे. त्यामुळे चुकीचं काम वाटलं त्यांच्या कोर्टात मी जाणार आहे, असा अप्रत्यक्ष इशाराच त्यांनी नूतन संचालक मंडळांना दिला. तसेच, सोमेश्वर साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने उसाला ३१०० रूपये प्रतिटन भाव दिला, हे चांगले झाले. आता एकरकमी एफआरपी द्यावी, असे आवाहनही सतीश काकडे यांनी आपल्या भाषणातून केले.

Ajit Pawar-Satish Kakade
टेकवडेंच्या गावाला उपाध्यक्षपद देऊनही तिथं बूथवर माणसं नव्हती; पुढच्या वेळी काटेवाडीतूनच माणसं पाठवतो!

काकडे कुटुंबीय हे बारामतीच्या राजकारणात पवार यांच्या कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जात होते. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यांसह विविध संस्थांवर काकडे कुटुंबीयांची सत्ता होती. मात्र हे राजकीय वैर विसरत सतीश काकडे यांनी अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची उघड्या जीपमधून आपल्या निंबूत गावातून मिरवणूक काढली होती. पवार-काकडे राजकीय वैर माझ्यासाठी संपले, विकासकामांच्या मुद्यावर मी कायम अजितदादांसोबत असणार आहे, असे त्यांनी त्यावेळी जाहीर केले होते.

Ajit Pawar-Satish Kakade
अजित पवारांचा यू टर्न : बाबांनो...पवारसाहेबांनाही विचारावे लागणार आहे!

विकासकामांच्या बाबतीत अजित पवार यांच्यासारखा नेता राज्यात दुसरा नाही, त्यामुळे इथून पुढे मी, माझी शेतकरी कृती समिती, काकडे गट कायमस्वरूपी अजितदादांच्या सोबत राहणार आहे, असे निवडणुकीपूर्वी सांगून त्यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलबरोबर आघाडी केली होती. त्या पॅनेलमधून सतीश काकडे यांचे चिरंजीव निवडून आले आहेत. तसेच, अजित पवार हेही चूक करणाराला सुटी देत नाहीत, त्यामुळे काळजीचे कारण नाही, असे विधानही त्यांनी मागच्या सभेत केले होते. निवडणुकीनंतर झालेल्या गाळप हंगामाच्या पहिल्याच सभेत काकडे यांनी वरील भावना व्यक्त केल्या.

ज्यांची ताकद आहे, त्यांनी टेंडर भरावे

याचवेळी बोलताना अजित पवार यांनी खासगी कारखान्यावरून भारतीय जनता पक्षालाही सुनावले आहे. राज्य सहकारी बँकेने बारा कारखाने चालवायला देण्यासाठी टेंडर काढलं आहे. ज्यांना कुणाला चांगले चालविण्याची ताकद आहे, असे वाटते त्यांनी टेंडर भरावे. ज्याला वाटत असेल आपण शेतकऱ्यांना चांगला भाव देऊ शकतो, बोनस-पगार-वाहतूक-तोडणी ही बिले देऊन लोकांना न्याय देऊ शकतो, त्यांनी कारखाना चालवायला घ्यावा, असे आव्हान पवार यांनी खासगीकरणाचे आरोप करणाऱ्या भाजप नेत्यांना केले

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in