अजितदादांनी पैसे दिले नाहीत, असे आम्ही आयुष्यात कधीही म्हणणार नाही!

मी माझ्या राजकारणाचा अनुभव सांगतो, कशासाठी खोटे बोलायचे?
Ajit Pawar News, Hitendra Thakur news, Maharashtra Assembly Session News
Ajit Pawar News, Hitendra Thakur news, Maharashtra Assembly Session NewsSarkarnama

मुंबई : अजितदादांची (Ajit Pawar) काम करण्याची पद्धत वेगळी आहे. भाषाशैली आणि बोलणं वेगळं आहे. पण, अजितदादांनी पैसे दिले नाहीत, असे कोणीही बोलू शकत नाही. आम्ही तर आयुष्यात बोलू शकत नाही. एखाद्या वेळी आरोप होतात, ठीक आहे. पण, मी माझ्या राजकारणाचा अनुभव सांगतो, कशासाठी खोटे बोलायचे?, असे सांगून बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी अजित पवार यांच्यावर निधीबाबत होणारे आरोप खोडून काढले. (No one can say that Ajit Pawar did not provide funds: Hitendra Thakur)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना आमदार ठाकूर यांनी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक केले. मात्र, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर होणाऱ्या आरोपांबाबत भाष्य केले. ठाकूर म्हणाले की, सत्ता येते आणि जाते. पण संबंध कसे ठेवात, हे महत्वाचे आहे. कधी काय होईल हे माहिती नाही. आज सत्तेवरून पायउतार झाल्यावर त्यांच्याविषयी काहीतरी बोलणे योग्य होणार नाही. ते माणुसकीला आणि राजकारणाला धरून होणार नाही.(Maharashtra Assembly Session News)

Ajit Pawar News, Hitendra Thakur news, Maharashtra Assembly Session News
अशोक चव्हाणांच्या मनात चाललंय तरी काय? विश्वासदर्शक ठरावास समर्थकांसह गैरहजर!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी पूर्वीपासून ओळखतो. पूर्वी एक जिल्हा असल्यामुळे त्यांच्याशी आमचा संबंध आहे. पूर्वीच्या शिवसेना नेत्यांनी मिळेल त्या साधनांच्या साहाय्याने संघटना बांधली. गावपातळीपर्यंत त्यांनी शिवसेना पोचवली. शिवसेना वाढविण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी बऱ्याच जणांना झटके दिले आहेत. मागील विधानसभेच्या निवडणुकीवेळी त्यांनी आमचाही आमदार त्यांनी शिवसेनेत घेतला. काय कला आहे, माहिती नाही. पण, त्याबद्दल दुःख नाही. कारण प्रत्येक पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करत असतो. मुख्यमंत्री महोदय तुम्ही एकत्र आहे, असे सांगता. पण, तुमच्या शेजारी जे (देवेंद्र फडणवीस) बसले आहेत, तेही गोड बोलतात आणि तेच काम (फोडाफोडीचे) करतात, त्यामुळे प्रत्येकजण आपापला पक्ष वाढवतात, असा टोलाही त्यांनी लगावला.(Ajit Pawar News in Marathi)

Ajit Pawar News, Hitendra Thakur news, Maharashtra Assembly Session News
माजी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसचे ७ आमदार बहुमत चाचणीस गैरहजर; राष्ट्रवादीच्या दोघांची दांडी

ठाकूर म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी तुम्ही शिवसेना संघटना वाढवली. पण, मुख्यमंत्री म्हणून बसल्यानंतर तुम्ही संघटना आणि सरकार यामध्ये फरक करा. संघटना म्हणून कधीही सरकार चालवू शकत नाही. भविष्यात तुम्ही आम्हाला न्याय द्याल ही अपेक्षा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com