‘बबड्या’ जेरबंद असल्याने यंदा ‘डॅडी’चं काय होणार!

निवृत्तीअण्णा गवारे यांना यंदाच्या निवडणुकीत मंगलदास बांदलांची उणीव भासणार
MLA Ashok Pawar-NivrutiAnna Gaware
MLA Ashok Pawar-NivrutiAnna GawareSarkarnama

शिक्रापूर (जि. पुणे) : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत (Pdcc bank) गेली सहा वर्षे तब्बल तीन संचालक असलेला तालुका म्हणून शिरूरचा नावलौकिक होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) ही संख्या यंदाच्या निवडणुकीत एकवर आणली. पक्षाने आमदार अशोक पवार यांच्यावर विश्वास टाकत त्यांना ‘अ’ वर्ग मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दैवत मानणारे विद्यमान संचालक निवृत्तीअण्णा गवारे यांना आपले संचालकपद टिकवण्याबरोबरच आता राष्ट्रवादीच्या विरोधाचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, निवृत्तीअण्णा गवारे यांच्यासोबत नेहमी ‘बबड्या’ म्हणून वावरणारे माजी सभापती मंगलदास बांदल सध्या तुरुंगात जेरबंद आहेत, त्यामुळे बांदल ज्यांना ‘डॅडी’ म्हणतात, त्या गवारे अण्णांचे काय होणार, याची उत्सुकता आहे. (NivrutiAnna Gaware will miss Mangaldas Bandal in this year's elections)

पुणे जिल्हा सहकारी बॅंकेच्या २०१६ निवडणुकीत शिरुर तालुक्यातून अ वर्ग मतदार संघातून निवृत्तीआण्णा गवारे, तज्ज्ञ संचालक म्हणून माजी आमदार पोपटराव गावडे, तर महिला संचालक म्हणून वर्षा शिवले यांना संधी दिली होती. तसेच बोनस म्हणून आंबेगाव-शिरुर मतदारसंघाचे आमदार तथा विद्यमान गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हेही चौथे संचालक शिरूरकरांसाठी होते. यावेळी मात्र केवळ अ मतदार संघातून आमदार अशोक पवार यांनाच संधी देण्यात आलेली आहे. पण, विद्यमान संचालक गवारे यांना पक्षाने उमेदवारीपासून दूर ठेवले आहे.

MLA Ashok Pawar-NivrutiAnna Gaware
तीन मंत्री, चार आमदार असलेले काँग्रेस-राष्ट्रवादीचे पॅनेल जाहीर : हवेलीत मैत्रीपूर्ण लढत

राष्ट्रवादीच्या पॅनेलमधून शिरूरमधून आमदार अशोक पवार यांनाच उमेदवारी जाहीर झाली आहे, त्यामुळे यंदाच्या पंचवार्षिकमध्ये शिरूरला बहुधा एकच संचालक मिळण्याची शक्यता आहे. तालुक्यातून महिला मतदार संघातून विद्यमान जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर व सुजाता नरवडे, इतर मतदार संघातून माजी उपसभापती अनिल भुजबळ, मागील वेळी निवडणुकीत उभे राहिलेले कोंढापुरीचे माजी सरपंच तथा माजी संचालक दिवंगत अरुणआबा गायकवाड यांचे चिरंजीव स्वप्निल गायकवाड, घोडगंगा कारखान्याचे माजी ज्येष्ठ संचालक पांडुरंगअण्णा थोरात, जिल्हा बॅंकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे, माजी आमदार पोपटराव गावडे यांचे चिरंजीव तथा घोडगंगा कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे हेही इच्छूक होते. मात्र, मर्यादित जागांमुळे त्यांचा विचार पक्षाकडून होऊ शकलेला नाही. त्यामुळे आमदार पवारांची वाट सुकर त्या अर्थाने सुकर झाली आहे, असे म्हटल्यास नवल नाही.

MLA Ashok Pawar-NivrutiAnna Gaware
काँग्रेसने साथ सोडलेले रवींद्र भोयर एकटेच मतदानाला आले!

निवृत्तीअण्णा गवारेंची कसोटी पाहणारी निवडणूक!

निवृत्तीअण्णा गवारे यांची जिल्हा बॅंकेची मागील निवडणूक ही माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या अनोख्या राजकीय डावपेचांनी गाजविली होती. गवारे अण्णा व बांदल यांची ‘बबड्या’ आणि ‘डॅडी’ची जोडी त्या काळी प्रसिद्ध झाली होती. बांदल हे गवारे यांना अण्णांना डॅडी म्हणायचे, तर गवारे हे बांदलांना बबड्या म्हणायचे. यंदाच्या निवडणूक मात्र गवारे यांची कसोटी पाहणारी ठरणारी आहे. कारण, यावेळी त्यांचा बबड्या जेरबंद आहे आणि समोर विरोधी उमेदवार म्हणून आमदार अशोक पवार स्वत: आहेत. पर्यायाने डॅडीचे आता काय होणार, अशी चर्चा शिरुर तालुक्यात सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com