Amol Mitkari News : गुजरातवरचे प्रेम कमी करुन महाराष्ट्रावर करावे; मिटकरींचा शिंदेंना टोला

Amol Mitkari News : अमोल मिटकरी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका
Amol Mitkari, NCP
Amol Mitkari, NCPSarkarnama

Amol Mitkari News : महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर मोठ्या प्रमाणात टिका केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गुजरातवरचे प्रेम कमी करुन, महाराष्ट्रावर करावे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

अमोल मिटकरी 'सरकारनामा ओपन माईक सिजन - 2' कार्यक्रमामध्ये बोलत होत्या. या कार्यक्रमाला भाजपचे (BJP) नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar), काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari), बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नेत्या दिपाली सय्यद, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande), उपस्थित होते.

Amol Mitkari, NCP
राणीच्या बागेत गेल्यावर आधी काय बघणार? वाघ की पेग्विंन; मनीषा कायदेंचे स्पष्ट उत्तर

कार्यक्रमामध्ये तीन राऊंड होते, पहिल्या राऊंड होता, 'काढा डिटेक्टर' यामध्ये नेत्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. दुसरा राऊंड होता 'ईडी' म्हणजेच 'इकडचा डॉन', या राऊंडमध्ये नेत्यांनीच नेत्यांना प्रश्न विचारायचे होते. तीसरा राऊंड 'करेक्ट कार्यक्रम' होता. यामध्ये उपस्थितांना काही कार्ड देण्यात आले होते. त्यामध्ये एक कार्ड त्यांनी निवडायचे होते. त्यावर फोटो असलेल्या नेत्याला ट्रोल करायचे होते.

'करेक्ट कार्यक्रम' या राऊंडमध्ये बोलताना मिटकरी यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. मिटकरी म्हणाले, कामाख्या देवीवर अपार श्रद्धा असलेले नेते. पक्ष आणि मते मॅनेज करणे शिंदे साहेबांकडून शिकावे. वाट जर चुकली तर माणून कोठे जातो, हे त्यांच्याकडे बघून समतजे, असा टोला त्यांनी लगावला.

Amol Mitkari, NCP
Deepali Sayed News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फसवले का? दीपाली सय्यद यांनी स्पष्टच सांगितले

एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना माझ्या जिल्ह्यातील अनेक लहान मुलांच्या शस्त्रक्रिया झाल्या होत्या, त्यामुळे मी त्यांना नमस्कार केला होता, असा खुलासाही त्यांनी केला. औटघटकेच्या मुख्यमंत्री पदासाठी त्यांना शुभेच्छा, असे मिटकरी म्हणाले. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी गुजरातवरचे प्रेम कमी करुन महाराष्ट्रावर करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com