हसतमुख जयंत पाटलांचा हात हातात घेत नरेंद्र मोदींनी विचारले, क्या आप.....

राजभवन येथील कार्यक्रमात मोदी आणि जयंत पाटील यांच्यात संवाद
Jayant Patil-Narendra Modi
Jayant Patil-Narendra ModiSarkarnama

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) 14 जून रोजी झालेला महाराष्ट्र दौरा भलताच गाजला. देहू संस्थान येथे शिळा मंदिराच्या अनावरण समारंभात मोदींचे जोरदार भाषण, त्याच कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना भाषणाची संधी नाकारणे, राजभवनातील कार्यक्रमात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना औरंगाबादच्या पाणीप्रश्नावर डिवचणे आणि तिसऱ्या कार्यक्रमात तर अजितदादांना व्यासपीठावर बसायला खुर्चीही न ठेवणे असे चर्चेचे विषय ठरले. या तीन कार्यक्रमांतील इतरही काही गमती आता पुढे येत आहेत.

राज्याचे जलसंधारण मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) हे नेहमीच आपल्या चेहऱ्यावर गंभीर भाव ठेवत वावरत असल्याचे अनेकदा दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपस्थितीत मुंबईतील राजभवनावर झालेल्या कार्यक्रमात मात्र जयंत पाटील हे अगदी उत्साहात होते. त्यांचा हा उत्साह मोदींच्याही नजरेतून सुटला नाही. (काही विशेष मंत्र्यांनाच या कार्यक्रमाला बोलविण्यात आले होते, हे नंतर छगन भुजबळ यांनी केलेल्या तक्रारीनंतर पुढे आले.)

Jayant Patil-Narendra Modi
मोदींच्या तिसऱ्या कार्यक्रमात तर अजितदादांना खुर्चीही नाही

राजभवनावरील कार्यक्रम संपताच मुख्यमंत्री ठाकरे, पवार आणि इतर नेते बीकेसीतील कार्यक्रमासाठी तातडीने निघाले. तेव्हा राजभवनातून मोदींना निरोप देण्यासाठी जयंत पाटील थांबले होते. कार्यक्रमानंतर मोदींना गाडीपर्यंत सोडण्यासाठी पाटील त्यांच्यासोबत होते. गाडीत बसण्याआधी मोदींनी आपली मान पाटलांकडे वळवली, तेव्हा पाटलांनी स्मितहास्याने मोदींना नमस्कार केला. मोदींनी त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह हेरला. मोदींनी जयंतरावांचा हात हातात घेतला आणि ‘जयंत आप ऊर्जा देखते हो' असा फिरकी घेणारा प्रश्न विचारला. त्यावर हशा पिकला. क्षणातच जयंतरावांनीही आपल्याकडे 'इरिगेशन' (जलसंधारण खाते) असल्याचे सांगितले. त्यांच्या या उत्तरावरही डबल हशा पिकला. इरिगेशन खाते हे गेल्या काही वर्षांपूर्वी राज्यात बरेच चर्चेत आले होते. त्यामुळे मोदींनीही त्या मागचा विनोद कळला.

Jayant Patil-Narendra Modi
धास्तीमुळेच पंतप्रधानांच्या कार्यक्रमात अजित पवार यांना बोलू दिले नाही!

असाच प्रसंग पुणे विमानतळावरही घडला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार हे मोदींच्या स्वागतासाठी हजर होते. त्यांच्याही खांद्यावर हात ठेवून मोदींनी त्यांची विचारपूस केली. देहू येथील कार्यक्रमात अजित पवार यांनी बोलावे, अशी सूचनाही मोदींनी केली होती. राजकीय वादविवादाने मोदींचा दौरा गाजला असला तरी त्यांच्या या कृतीचीही चर्चा राजकीय वर्तुळात होती.

अर्थात त्यानंतर अजित पवार यांना भाषणाची संधी न दिल्याचा मुद्दा राजकीय वर्तुळात पेटला आणि त्यात जयंत पाटीलही हिरीरीने उतरले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com