राणेंच्या धक्कातंत्राने दळवी अध्यक्ष बनले...पण लगेच `गायब`ही झाले

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या (Sindhudurg District Bank) अध्यक्षपदी कोण बसणार, याची उत्सुकता होती
Nitesh Rane
Nitesh Rane Sarkarnama

ओरोस : भाजप नेते केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पुन्हा धक्कातंत्राचा वापर केल्याने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Sindhudurg District Bank) अध्यक्षपदी मनीष दळवी तर उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर 11 विरुद्ध सात मतांनी विजयी झाले. महाविकास आघाडीच्यावतीने व्हिक्टर डांटस व सुशांत नाईक यांनी अनुक्रमे अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केल्याने यासाठी मतदान झाले. निवडीनंतर राणे यांनी स्वतः जिल्हा बँकेत येत नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना शुभेच्छा दिल्या.

Nitesh Rane
मोठी बातमी : अज्ञातवासात असलेले नितेश राणे थेट बँकेत प्रकटले

पूर्ण राज्यात लक्षवेधी ठरलेल्या जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक झाली. भाजपची सत्ता आल्याने मंत्री राणे कोणाला संधी देतात? याकडे लक्ष लागले होते; मात्र आमदार नितेश राणे यांचे अत्यंत विश्वासू मनीष दळवी यांचे नाव अध्यक्ष पदासाठी जाहीर करतानाच उपाध्यक्षपदी जुने भाजप पदाधिकारी अतुल काळसेकर यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे सर्वांचेच डोळे विस्फारले; परंतु राणे यांनी नेहमीच्या स्टाईलने धक्कातंत्राचा वापर केला. त्यानंतर या दोघांनी अर्ज दाखल केले. या निवडी बिनविरोध होतील, असे वाटत असतानाच महाविकास आघाडीकडून अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या डांटस तर उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या नाईक यांनी उमेदवारी दाखल केल्याने निवडीतील चुरस अधिकच वाढली होती.

Nitesh Rane
फडणवीस तर स्टेजवरचे अॅक्टर, राणे, विखेच भाजप चालवतात..

सकाळी 11 ते 11.30 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करून घेतल्यानंतर 11.40 पर्यंत उमेदवारी अर्ज छाननी करण्यात आली. एकही अर्ज बाद झाला नाही. त्यानंतर 12 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्यानंतर प्रत्यक्ष मतदान घेण्याची वेळ होती. सहकार निवडणूक निर्णयानुसार निवडणूक निर्णय अधिकारी वंदना खरमाळे यांनी गोपनीय मतपत्रिकेद्वारे मतदान प्रक्रिया राबविली. 12.30 नंतर ही प्रक्रिया राबविण्यात आली. पहिल्यांदा अध्यक्ष पदासाठी मतदान घेण्यात आले. त्यानंतर उपाध्यक्ष पदासाठी त्याचप्रकारे मतदान घेण्यात आले. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर मतमोजणी करण्यात आली. यावेळी भाजपच्या दोन्ही उमेदवारांना 11 तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना सात अशी मते मिळाली. त्यामुळे अध्यक्षपदी दळवी चार मतांनी तर उपाध्यक्षपदी काळसेकर चार मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी खरमाळे यांनी जाहीर केले.

यावेळी दळवी, काळसेकर, संदीप परब, समीर सावंत, गजानन गावडे, विठ्ठल देसाई, दिलीप रावराणे, प्रकाश बोडस, प्रज्ञा ढवण, रवींद्र मडगांवकर, महेश सारंग हे भाजपचे तर डांटस, नाईक, विद्याप्रसाद बांदेकर, विद्यानंद परब, गणपत देसाई, आत्माराम ओटवणेकर, मेघनाथ धुरी हे महाविकास आघाडीचे संचालक उपस्थित होते. केवळ काँग्रेसच्या नीता राणे अनुपस्थित होत्या.

Nitesh Rane
नितेश राणेंना जामीन की तुरूंगात जाणार? उच्च न्यायालयानं ठरवली तारीख

महाविकास आघाडीच्या नीता राणे अनुपस्थित
भाजपचे बहुमत असताना महाविकास आघाडीने सुद्धा अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले होते. महाविकास आघाडीकडे आठ संचालक आहेत. त्यातील काँग्रेसच्या नीता राणे निवड प्रक्रियेवेळी अनुपस्थित होत्या. त्यामुळे विरोधकांचे एक मत कमी झाले होते. तरीही महाविकास आघाडीने अर्ज दाखल केल्याने भाजपचे संचालक फुटले की काय ? अशी चर्चा सुरू होती; परंतु भाजपच्या गोटातून विरोधकांच्या सात संचालकांतून एक मत आमच्या उमेदवाराने मिळणार आणि बारा मते होणार, असे बोलले जात होते. प्रत्यक्षात मात्र सर्वांची मते जागच्या जागी राहिली. कोणाचीही मते फुटली नाहीत.

Nitesh Rane
मुंबै बॅंक : चिठ्ठी उचलली गेली आणि उपाध्यक्षपद तरी भाजपला मिळाले

केंद्रीयमंत्री राणे ठाण मांडून
आतापर्यंत अनेकवेळा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपंचायत, नगरपरिषदा व जिल्हा बँक यांच्या पदाधिकारी निवडी केल्या. अर्ज भरण्यापूर्वी काहीवेळ आधी बंद लिफाफा पाठवून त्याद्वारे नावे कळविली गेली. त्यात असलेल्या नावाच्या उमेदवारांना त्यांच्या लोकप्रतिनिधींनी मतदान केले. ते कधीच निवडी ठिकाणी आले नाहीत. उलट निवड प्रक्रिया संपल्यानंतर निवड झालेले पदाधिकारी त्यांच्या घरी जाऊन आशीर्वाद व शुभेच्छा घेत होते; मात्र आज ते निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी बँकेच्या प्रवेशद्वारावर आले होते. तेथे आपल्या सर्व संचालकांना सोडल्यानंतर ते जिल्हा परिषदेत जाऊन बसले होते. तेथून त्यांचा बँकेच्या या निवड प्रक्रियेवर बारीक लक्ष होता. निवड प्रक्रिया पूर्ण होताच ते स्वतः जिल्हा बँकेत येत अध्यक्ष दालनात थांबले होते. तेथे नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना शुभेच्छा दिल्या.

Nitesh Rane
भाजपमधून बाहेर पडताच नेत्याची भविष्यवाणी :राधाकृष्ण विखे होणार नवे प्रदेशाध्यक्ष

निवड होताच मनीष दळवी भूमिगत
शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल असल्याने अटकपूर्व जामिनासाठी मनीष दळवी यांची केस न्यायालयात सुरू आहे. उच्च न्यायालयाने त्यांना या निवडणुकीत उपस्थित राहून मतदान करण्याची मुभा दिली होती. त्यामुळे अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मंत्री राणे व निवडणूक निर्णय अधिकारी सौ. खरमाळे यांच्या सदिच्छा स्वीकारल्यानंतर मनीष दळवी अचानक गायब झाले. त्यांनी अन्य कोणाच्याही शुभेच्छा स्वीकारल्या नाहीत.

Nitesh Rane
मुंबै बॅंक : चिठ्ठी उचलली गेली आणि उपाध्यक्षपद तरी भाजपला मिळाले

अतुल काळसेकरांवर शुभेच्छांचा वर्षाव
अध्यक्ष निवडीनंतर मनीष दळवी भूमिगत झाल्याने जिल्हाभरातून दाखल झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचे जोरदार स्वागत केले. प्रधान कार्यालयातील निवडणूक प्रक्रिया पार पडलेल्या सभागृहात त्यांनी या शुभेच्छा स्वीकारल्या. मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

बंदोबस्त आणि गर्दी
अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, माजी संचालक प्रकाश मोर्ये, प्रकाश गवस, गुरुनाथ पेडणेकर, सभापती शर्वाणी गांवकर, जिल्हा परिषद सदस्य सावी लोके, श्वेता कोरगांवकर, सायली सावंत, मेघा गांगण, दिपलक्ष्मी पडते, एकनाथ नाडकर्णी, प्रमोद कामत, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com