आदिती तटकरेंना कॅबिनेट मंत्रिपद देण्याची माझी इच्छा : जयंत पाटलांनी केले कौतुक

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका जर वेळेवर झाल्या असत्या तर राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले असते मात्र तरी कधीही निवडणूक होवोत राष्ट्रवादीच एक नंबरवर राहणार आहे.
आदिती तटकरेंना कॅबिनेट मंत्रिपद देण्याची माझी इच्छा : जयंत पाटलांनी केले कौतुक
Jayant Patil-Aditi TatkareSarkarnama

पेण : रायगडच्या (Raigad) पालकमंत्री तथा राज्यमंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांचे काम मोठ्या चिकाटीने सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील विकास कामांसाठी झटून निधी आणण्याचे काम त्या करत आहेत. अदिती यांच्या कामाचा आवाका पाहता त्यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यावे, अशी इच्छा होते, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज पेणच्या दौऱ्यावर आल्यानंतर बोलून दाखवली. (My wish to give cabinet post to Aditi Tatkare : Jayant Patil)

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रायगड जिल्ह्याच्या पेण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. त्यात त्यांनी अदिती तटकरे यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच सध्या त्यांच्याकडे राज्यमंत्रीपद असून त्यांच्या कामाचा आवाका पाहून आदिती यांना कॅबिनेट मंत्री देण्याची माझी इच्छा आहे, असेही त्यांनी सांगितले.

Jayant Patil-Aditi Tatkare
जयंत पाटलांची ‘एबी फाॅर्म’ घेऊन जायची ऑफर..!

जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील जवळपास सर्व खासदारांशी माझे चांगले संबंध आहेत. मात्र, सुनील तटकरे हे एक झुंजार खासदार आहेत. हातात घेतलेले कामे पूर्ण केल्याशिवाय ते स्वस्थ बसत नाहीत. त्यामुळेच त्यांना मोठा जनाधार लाभला आहे. मतदारसंघाला न्याय देणारा खासदार तुम्ही निवडून दिला आहे.

Jayant Patil-Aditi Tatkare
मी काँग्रेसचा शहराध्यक्ष; पैसे दे नाही तर महिला अंगावर सोडेन : धमकी देत लाटली १८ लाखांची जमीन

गेल्या २२ वर्षांत आपण पेणमध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळावर निवडणूक लढवलेली नाही. लोकसभेच्या २०१४ मधील निवडणुकीत माझा निसटता पराभव झाला. मात्र, २०१९ मध्ये पेण, रोहा, श्रीवर्धन या तालुक्यांनी भरभरून मतदान केले आणि माझा विजय झाला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका जर वेळेवर झाल्या असत्या तर राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले असते मात्र तरी कधीही निवडणूक होवोत राष्ट्रवादीच एक नंबरवर राहणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.

Jayant Patil-Aditi Tatkare
कोणाला मतदान करावे, यासाठी मला अर्धा मिनिट लागला : संभाजीराजे पडले बुचकळ्यात

पालकमंत्री अदिती तटकरे म्हणाल्य की, अष्टविनायकापैकी एक असलेल्या पाली गणपती, विनोबा भावे यांच्या स्मारकाच्या विकासासाठी निधी मंजूर झाला आहे. विकासकामांना गती दिली जात आहे, त्यामुळे संघटनेकडे लोक आकर्षित होत आहे. मला विश्वास आहे की इथली संघटना बळकट होईल आणि पेण विधानसभेत पुन्हा राष्ट्रवादीचा आवाज घुमेल.

Jayant Patil-Aditi Tatkare
खोत-पडळकरांवर राष्ट्रवादीचा संशय; 'सदावर्तेंना मिळालेल्या पैशांतील काही वाटा मिळाला का?'

पेणच्या तालुकाध्यक्षांनी येथील परिस्थिती सांगितली. एक वेळ होता की इथे राष्ट्रवादी पक्षाची चांगली ताकद होती. मात्र, मधल्या काळात संघटनेची ताकद कमी झाली. शरद पवार यांनी मला जिल्हा परिषदेवर संधी दिली. मग मी व अनिकेत तटकरे यांनी इथल्या विकास कामांना गती दिली आणि पेण-सुधागडचे प्रश्न सोडवले. संघटना वाढण्याची पुन्हा सुरूवात केली आहे. सुधागड येथे सुखसुविधा उपयुक्त क्रिडा संकुल उभारले आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी मंजूर झाले आहे, लवकरच कामाला सुरुवात होईल. आदिवासी बांधवांसाठी प्रशिक्षण केंद्र तयार करण्याचा आमचा मानस आहे, असेही अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

या वेळी आमदार अनिकेत तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, महिला जिल्हाध्यक्षा उमाताई मुंडे, युवक जिल्हाध्यक्ष अंकीत साखरे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in