संजय राऊत दिल्लीला निघण्यापूर्वीच 'ईडी'ने आपला डाव साधला!

संजय राऊत हे राज्यसभेचे सदस्य (खासदार) आहेत. सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्या अधिवेशनाला जाण्यासाठी खासदार संजय राऊत हे आज रात्री दिल्लीला जाणार होते.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama

मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) हे राज्यसभेचे सदस्य (खासदार MP) आहेत. सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्या अधिवेशनाला जाण्यासाठी खासदार संजय राऊत हे आज रात्री दिल्लीला (Delhi) जाणार होते. मात्र, त्या अगोदरच सक्तवसुली संचनालयाने (ईडीने ED) आज (ता. ३१ जुलै) सकाळीच राऊत यांच्या घरावर छापेमारी करत त्यांना दिल्लीला जाण्यापासून रोखत आपला डाव साधला. तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. (MP Sanjay Raut was taking custady by ED for questioning)

दरम्यान, संजय राऊत यांचे निवासस्थान असलेल्या मैत्री बंगल्याबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती, त्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. सध्या चौकशीसाठी संजय राऊत यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले आहे.

Sanjay Raut
संजय राऊतांना ईडीने अटक केलेली नाही : आमदार सुनील राऊतांनी दिली महत्वपूर्ण माहिती

पत्राचाळ प्रकरणात ईडीने आतापर्यंत तीन वेळा खासदार राऊत यांना समन्स बजावले होते. पहिल्या समन्सला संजय राऊत यांनी उत्तर दिले होते. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या समन्सला मात्र राऊत यांनी कुठल्याही प्रकारचे उत्तर दिलेले नव्हते. त्यामुळेच खासदार राऊत हे ईडीला चौकशीत सहकार्य करत नाहीत, असे ईडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे होते.

Sanjay Raut
परभणीत शिवसेना अखेर फुटलीच : उपजिल्हाप्रमुख माणिक पोंढे यांचा शिंदे गटात प्रवेश

दरम्यान, ईडीच्या तीन टीम संजय राऊतांच्या चौकशीसाठी आल्या होत्या. त्यातील एक गार्डन कोटच्या घरी, दुसरी मैत्री बंगल्यावर, तर तिसरी टिम राऊतांशी संबंधित लोकांकडे गेली होती. सकाळपासून तब्बल नऊ तास चौकशी केल्यानंतर संजय राऊत यांना घेऊन हे अधिकारी ईडीच्या कार्यालयात गेले आहेत, त्या ठिकाणी चौकशी करण्यात येऊन पुढील कार्यवाही होणार आहे.

Sanjay Raut
राऊतांच्या घरी ईडीचा छापा; एकनाथ शिंदे म्हणतात, ‘आपल्याला इकडे मोठी कारवाई करायचीय...’

तिसऱ्या समन्सनंतरही संजय राऊत हे ईडीच्या समोर जाण्याचे टाळत होते. सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन चालू आहे, त्यासाठी आज रात्री संजय राऊत हे दिल्लीला रवाना होणार होते. मात्र त्यांना दिल्लीला जाण्यापासून रोखण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांनी रविवारी सकाळची वेळ निवडली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला हजर राहण्यासाठी रविवारी रात्रीच ते दिल्लीला रवाना होणार होते. म्हणून आज सकाळची वेळ ईडीने निवडली आणि संजय राऊतांना दिल्लीला जाण्यासाठी रोखले. मात्र, तत्पूर्वीच ईडीने रविवारी सकाळी भल्या पहाटे जात आपला डाव साधला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com