थोपटे, मोरे, बाणखेले, आढळरावांनंतर खासदार कोल्हेंनीही घेतला त्या हातगाडीवर चहाचा आस्वाद!

तेव्हाही त्यांनी त्या टपरीवर जाऊन चहा घेतला होता.
MP Amol Kolhe
MP Amol Kolhe Sarkarnama

मंचर (जि. पुणे) : आंबेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना चहाची तल्लफ झाली आणि खासदारांनी चक्क मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अथर्व बाळासाहेब टेमकर यांच्या हातगाडीवर कार्यकर्त्यांसह चहाचा आस्वाद घेतला. या टपरी पाच माजी खासदार, दोन विद्यमान मंत्री, एक माजी मंत्री आणि अनेक आमदारांसह दिग्गज नेत्यांनी चहा घेतला आहे. आता त्यात विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांची भर पडली आहे. (MP Amol Kolhe took tea on a handcart in Manchar)

पारूबाई गेनभाऊ टेमकर यांचा हा चहाचा व्यवसाय तीन पिढ्यांपासून आहे. सध्या हा व्यवसाय त्यांचे नातू अथर्व पाहतात. सहकार महर्षी माजी आमदार (स्व.) दत्तात्रेय वळसे पाटील यांचे गेनभाऊ टेमकर हे मित्र होते. पूर्वी कार्यकर्त्यांचा चहापान व बैठक व्यवस्था येथेच होती. माजी मंत्री अनंतराव थोपटे, माजी खासदार रामकृष्ण मोरे, माजी खासदार किसनराव बाणखेले, माजी खासदार निवृत्तीशेठ शेरकर, माजी खासदार अशोकराव मोहोळ, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आमदार अमोल मिटकरी यांच्यासह अनेक दिग्गजांनी येथे येऊन चहाचा आनंद घेतलेला आहे.

MP Amol Kolhe
एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला तळोजा तुरुंगात का वाटते भीती?

लोकसभा निवडणूक प्रचाराच्या धामधुमीतही डॉ. अमोल कोल्हे यांचे भाषण सुरू असतानाच वेलची व आले टाकलेल्या चहाचा सुगंध व्यासपीठापर्यंत दरवळला होता. तेव्हाही त्यांनी त्या टपरीवर जाऊन चहा घेतला होता. आंबेगाव तालक्याच्या दौऱ्यावर आलेल्या कोल्हे यांनी शनिवारीही (ता. २ आक्टोबर) चहा घेऊन दुकानाचे मालक बाळासाहेब टेमकर व मुलगा अथर्व यांचे कौतुक केले. चहाची कॉलिटी अजूनही टिकून ठेवल्याबद्दल त्यांनी टेमकर यांचे अभिनंदनही केले.

MP Amol Kolhe
आमच्या लहानपणी भाऊसाहेबांचा मोठा दरारा असायचा; कुणाचीही जमीन कुणाच्याही नावावर करायचे!

या वेळी खासदार कोल्हे यांच्या समवेत पुणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, आंबेगाव बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, संचालक प्रदीप वळसे पाटील, दत्ता थोरात, मंचरचे उपसरपंच युवराज बाणखेले, अंकित जाधव, सुहास बाणखेले, लक्ष्मण थोरात भक्ते, संजय बाणखेले, राजेंद्र थोरात, प्रवीण मोरडे, बाजीराव मोरडे, सुरेश निघोट आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in