मोठी बातमी : आमदार संजय शिरसाठ यांची मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी अन्‌ सत्तारांच्या आरोपांची चर्चा...

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्‌घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले.
Abdul Sattar -Eknath Shinde-Sanjay Shirsat
Abdul Sattar -Eknath Shinde-Sanjay ShirsatSarkarnama

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) येऊनही आमदार संजय शिरसाठ (Sanjay Shirsat) यांनी सिल्लोड (Sillod) कृषी महोत्सवाच्या उद्‌घाटन कार्यक्रमाला दांडी मारली. कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शनिवारी केलेला आरोप आणि आज आमदार शिरसाठ यांची मुख्यमंंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. त्यामुळे सत्तार यांच्या आरोपाचा रोख कोणाकडे असा सवाल उपस्थित होत आहे. (MLA Sanjay Shirsat absent from Chief Minister Shinde's program in Sillod)

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्‌घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. त्या कार्यक्रमाला शिंदे गटाचे औरंगाबाद जिल्ह्यातील मंत्री आणि बहुतांश आमदार उपस्थित होते. आमदार शिरसाठ हे गैरहजर होते. त्यांच्या गैरहजेरीबाबत सत्तार म्हणाले की, आमदार संजय शिरसाठ हे सिल्लोडच्या कृषी महोत्सवाला का आले नाहीत, हे मला माहिती नाही. आमदार संजय शिरसाठ हे माझे मित्र आहेत. मला कोणाचे नाव घ्यायचे नाही. पण जे कृषी महोत्सवाला आले त्यांना धन्यवाद आणि जे आले नाहीत, त्यांनाही धन्यवाद.

Abdul Sattar -Eknath Shinde-Sanjay Shirsat
Abdul Sattar : माझ्याविरोधात कट रचणाऱ्या नेत्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली : सत्तारांचे मोठे विधान

दरम्यान, माझ्याविरोधात कट रचणाऱ्या नेत्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे, असेही विधान त्यांनी केले. मी कुणावरही नाराज नाही. तसेच, मुख्यमंत्रीही माझ्यावर नाराज नाहीत, असेही अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.

Abdul Sattar -Eknath Shinde-Sanjay Shirsat
Shinde Group News : शिंदे गटातील धूसफूस वाढली : सत्तारांनी माझ्याशी बोलायला हवे होते; वरिष्ठ मंत्र्याने सुनावले

नागपूर अधिवेशनात कृषीमंत्री सत्तार यांच्यावर गायरान जमीन गैरव्यवहार आणि सिल्लोड कृषी महोत्सवासाठी वसुलीचा आरोप झाला होता. त्याप्रकरणी त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात आली होती. त्यावर बोलताना शिंदे गटातील नेत्यानेच माझ्याविरोध कट रचल्याचा आरोप सत्तार यांनी केला होता. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही करण्यात आली आहे. तसेच, मंत्रिपदासाठी स्पर्धेत असलेल्या नेत्याकडूनच हे कटकारस्थान झाल्याचा आरोपही सत्तार यांनी केला होता.

Abdul Sattar -Eknath Shinde-Sanjay Shirsat
NCP News : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्षावर जिवघेणा हल्ला; प्रकृती चिंताजनक

सत्तार यांचे आरोप आणि संजय शिरसाठ यांचे कृषी महोत्सवाला न जाणे याचा संबंध जोडून सध्या चर्चा होत आहे. त्यामुळे सत्तार यांचा रोख आमदार शिरसाठ यांच्याकडे तरी नाही ना, अशीही कुजबूज सध्या मराठवाड्यात होत आहे. दरम्यान, आमदार संजय शिरसाठ माझे मित्र आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com