तब्बल २३ वर्षांनंतर घरात मुलगी जन्माला आली; आमदार मोहितेंनी हेलिकॉप्टरमधून घरी आणले!

नातीच्या स्वागतासाठी आमदार मोहिते कुटुंबीयांकडून फुग्यांच्या कमानी उभारण्यात आल्या होत्या. फुलांच्या पायघड्यांवरून तिला वाड्यात नेण्यात आले.
तब्बल २३ वर्षांनंतर घरात मुलगी जन्माला आली; आमदार मोहितेंनी हेलिकॉप्टरमधून घरी आणले!
Dilip Mohite &FamilySarkarnama

राजगुरूनगर (जि. पुणे) : ज्यांच्या स्वागतासाठी नेहमी कार्यकर्ते आणि समर्थक थांबलेले असतात. ते आमदार कुटुंबीयांसह एका पाहुणीच्या स्वागतासाठी तिष्ठत उभे होते. आकाशात हेलिकॉप्टर घरघरले, जमिनीवर उतरले आणि त्या विशेष पाहुणीच्या स्वागतासाठी सर्वजण तिकडे झेपावले. (MLA Dilip Mohite welcomed the birth of girl child with great enthusiasm)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खेडचे आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite) यांनी आपल्या नातीचे अनोखे स्वागत केले. त्यांचे पुतणे मयूर मोहिते यांना महिनाभरापूर्वी कन्यारत्न झाले. तिचे राजनंदिनी असे नामकरण करण्यात आले. आधीच मोहिते यांच्या घराण्यात मुली कमी, त्यात राजनंदिनीच्या रुपाने तब्बल २३ वर्षांनंतर घरात मुलीचा जन्म झाला. त्यामुळे आमदार मोहिते आणि त्यांच्या पत्नी सुरेखा मोहिते यांना अतिशय आनंद झाला. कुटुंबीयांच्याही आनंदाला पारावार राहिला नाही. आमच्या घरी लक्ष्मी आली, असे ते पाहुण्यांना सांगत होते.

Dilip Mohite &Family
राष्ट्रवादीने छू म्हटले की, पोलिस शिवसैनिकांच्या पाठीमागे लागतात : आढळरावांची खंत

स्त्रीजन्माचे स्वागत व्हावे आणि समाजात चांगला संदेश जावा, म्हणून राजनंदिनीचे अनोखे स्वागत करण्याचे नियोजन आमदार मोहिते यांनी केले. आजोळहून तिला खास हेलिकॉप्टरने राजगुरूनगरला आणण्याचा बेत ठरला. तिच्या अनोख्या स्वागतासाठी येथील आमदारवाडा सज्ज झाला. त्यानुसार गुरुवारी (ता. २७ मे) दुपारी येथील क्रीडासंकुलाच्या मैदानावर तिचे आगमन झाले. सर्व कुटुंबीयांनी हातात घेऊन तिचे मुखदर्शन घेतले. नंतर आमदारवाड्यावर आल्यावर फुलांच्या पाकळ्या मायलेकींवर उधळण्यात आल्या.

Dilip Mohite &Family
संभाजीराजेंच्या पाठिंब्याबाबत थोरातांचा मोठा गौप्यस्फोट; 'मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती...'

नातीच्या स्वागतासाठी आमदार मोहिते कुटुंबीयांकडून फुग्यांच्या कमानी उभारण्यात आल्या होत्या. फुलांच्या पायघड्यांवरून तिला वाड्यात नेण्यात आले. ओल्या कुंकवात, तिचे पाय बुडवून त्या पायांचे ठसे शुभ्र कापडावर घेऊन, तिचा गृहप्रवेश करण्यात आला. पारंपरिक पद्धतीने विधी झाल्यानंतर केकही कापण्यात आला. राजगुरूनगरहून नंतर तिला शेलपिंपळगावला पाठविण्यात आले. तिथेही बग्गीतून तिची मिरवणूक काढण्यात आली.

Dilip Mohite &Family
'संभाजीराजेंनी ती ऑफर स्वीकारली असती तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती...'

आमच्या चौघा भावांच्या घरात खूप वर्षांनी मुलीचा जन्म झाला : मोहिते

यासंदर्भात आमदार दिलीप मोहिते म्हणाले की, समाजात स्त्रीला सन्मान मिळावा, यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोक प्रयत्नशील असतात. फक्त उपदेश करण्यापेक्षा राजकीय नेत्यांनी प्रत्यक्ष कृतीतून भूमिका घेतली, तर लोकांना अधिक भावते. तसेच आमच्या चौघा भावांच्या मोठ्या घरात खूप वर्षांनी मुलीचा जन्म झाल्याने आम्हाला खूप आनंद झाला. म्हणून लक्ष्मीच्या पावलांनी जन्मलेल्या नातीच्या आम्ही मनःपूर्वक स्वागत केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in