बबनदादांचे ‘नो कॉमेंट्‌स’, तर रणजितसिंह म्हणतात ‘ प्रवेशाबाबत योग्य वेळी सांगू’

ही भेट घडविण्यात महत्वाची भूमिका निभावणारे खासदार निंबाळकर यांनी फडणवीस-पाटील-शिंदे भेटीवर भाष्य केले.
Rajan Patil-Baban Shinde-Ranjeetsingh Naik Nimbalkar
Rajan Patil-Baban Shinde-Ranjeetsingh Naik NimbalkarSarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे (Baban Shinde) आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांनी आज (ता. २५ जुलै) दिल्लीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. मात्र, ही भेट घडवून आणण्यात माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjeetsingh Naik Nimbalkar) यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. दिवसभर कॅमेऱ्याच्या मागे असलेले निंबाळकर यांनी संध्याकाळी पुढे येत ‘आज काही चर्चा नाही; योग्य वेळ आल्यानंतर सर्वकाही सांगण्यात येईल’ असे उत्तर देऊन दोघांच्या भाजप प्रवेशाबाबतची उत्सुकता वाढवली आहे. तर बबनदादांनी ‘नो कॉमेंट्‌स’ म्हणत भेटीबाबत बोलण्यास नकार दिला. (MLA Baban Shinde's 'no comments' reply on Devendra Fadnavis's meet)

आमदार शिंदे आणि माजी आमदार पाटील या जोडीने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत राज्यात खळबळ उडवून दिली आहे. दिल्लीत महाराष्ट्र सदनात झालेल्या भेटीचे हादरे आज दिवसभर राज्याच्या राजकारणात बसत होते. या भेटीप्रकरणी महत्वाची भूमिका निभावणारे हे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर असल्याचे स्पष्ट झाले आहे. ते दिवसभर याबाबत पडद्यामागे होते. मात्र, सायंकाळी या भेटीबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Rajan Patil-Baban Shinde-Ranjeetsingh Naik Nimbalkar
फडणवीस भेट आणि भाजप प्रवेशाबाबत राष्ट्रवादीचे बबनदादा शिंदेंनी स्पष्टच सांगितले...

या व्हिडिओमध्ये आमदार बबनराव शिंदे, खासदार निंबाळकर, माजी आमदार राजन पाटील स्पष्टपणे दिसत आहेत. राजन पाटील यांनी कॅमेऱ्यापुढे येण्याचे टाळले. त्यांना पत्रकरांंनी जेव्हा पुढे येण्याचे आवाहन केले, तेव्हा बबनदादा आणि निंबाळकर हे एकच मतदारसंघातील असल्याचे सांगून मागे राहणेच पसंत केले. आमदार शिंदे यांना फडणवीस यांची भेट घेतली का, तसेच भाजप प्रवेश कधी? असे विचारले असता ‘नो कॉमेंट्‌स’ म्हणत काढता पाय घेतला.

Rajan Patil-Baban Shinde-Ranjeetsingh Naik Nimbalkar
पवारसाहेबांबद्दल नितांत आदर; भाजपप्रवेशाचे तुम्हाला कळेलच : फडणवीस भेटीवर राजन पाटील म्हणाले...

ही भेट घडविण्यात महत्वाची भूमिका निभावणारे खासदार निंबाळकर यांनी फडणवीस-पाटील-शिंदे भेटीवर भाष्य केले. ते म्हणाले की, आज कुठल्याही कमेंट्‌स नाहीत. आज काही चर्चा झाली नाही. योग्य वेळ आल्यावर तुम्हा सर्वकाही सांगितले जाईल, असे सांगत भेटीबाबत आणि या दोघांच्या भाजप प्रवेशाबाबत स्पस्पेन्स वाढवला आहे.

Rajan Patil-Baban Shinde-Ranjeetsingh Naik Nimbalkar
राष्ट्रवादीला मोठा धक्का : बबनदादा शिंदे, राजन पाटलांनी घेतली दिल्लीत फडणवीसांची भेट

दुसरीकडे, विरोधी पक्षनेते अजित पवारांना याबाबत विचारले असता त्यांनी बबनदादा हे त्यांच्या कामानिमित्त दिल्लीत गेले आहेत. मी उपमुख्यमंत्री असतानाही विरोधी पक्षातील लोक माझीही भेट घेत होते. त्यामुळे भेट घेतली म्हणजे आमदार शिंदे भाजपमध्ये गेले असे होत नाही, असे सांगून त्या भेटीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com