अजितदादांच्या नादाला लागल्यानंतर काय होते, हे इंदापूर, पुरंदरने पाहिलंय!

इंदापूरच्या काही लोकांनी सोलापूरवाल्यांचा विनाकारण गैरसमज केला. उजनीचे पाणी इंदापूरला मिळाले, तर आपल्या राजकारणाचे काय होईल, अशी त्यांना भीती वाटली असावी.
Ajit Pawar-Harshvardhan Patil-Vijay Shivtare-Dattatrey Bharane
Ajit Pawar-Harshvardhan Patil-Vijay Shivtare-Dattatrey BharaneSarkarnama

वालचंदनगर (जि. पुणे) : आमचा दादा (उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar) हा दादाच आहे. दादांच्या नादाला लागल्यानंतर काय होऊ शकतं, हे इंदापूर आणि पुरंदरने (सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील Harshvardhan Patil व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे Vijay Shivtare यांचा पराभव) पाहिले आहे, असा टोला राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatrey Bharane) यांनी विरोधक माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना नाव न घेता लगावला (Minister of State Dattatrey Bharane criticizes the opposition in Indapur)

इंदापूर तालुक्यातील निरवांगी येथे ३० कोटी ८० लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्‌घाटनाच्या कार्यक्रमात भरणे बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या सख्य संपूर्ण महाराष्ट्राला सूर्वश्रूत आहे. पाटील यांना इंदापुरातच मात देण्यासाठी अजित पवारांनी भरणे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले होते. त्यानंतर विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा अजित पवारांच्या पाठिंब्यावर पराभव केला. तसेच, २०१९ च्या निवडणुकीतही भरणे यांनी पाटील यांना दुसऱ्यांदा पराभूत केले होते.

Ajit Pawar-Harshvardhan Patil-Vijay Shivtare-Dattatrey Bharane
लाकडी-निंबोडी योजनेच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांची सही; पवारांच्या हस्ते लवकरच भूमिपूजन!

दरम्यान, विधानसभेच्या २०१९ च्या निवडणूकीपूर्वी पुरंदरचे आमदार तथा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबीयांवर टीकास्त्र सोडायचे. ती टीका जहरी असायची. त्यामुळे अजित पवारांनी उघडपणे शिवतारेंना आव्हान दिले होते. यंदाच्या निवडणुकीत ते पुरंदरमधून कसे निवडून येतात, ते मी पाहतोच, असे जाहीर वक्तव्य त्यांनी केले होते. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटल्यानंतर संजय जगताप यांच्या पाठीशी राष्ट्रवादीची संपूर्ण ताकद उभी करुन शिवतारे यांचा पराभव घडवून आणला होता. तोच धागा पकडून भरणे यांनी इंदापूर तालुक्यासह राज्यातील विरोधकांना दादांचा नाद करू नका, असा अप्रत्यक्ष सल्ला दिला.

Ajit Pawar-Harshvardhan Patil-Vijay Shivtare-Dattatrey Bharane
मोहिते-पाटलांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला सत्तेची लॉटरी!

भरणे म्हणाले की, उजनीच्या पाण्यासंदर्भात इंदापूरच्या काही लोकांनी सोलापूरकरांचा गैरसमज केला. आपल्याच तालुक्यातून काही कागदपत्रे सोलापूरमध्ये गेली. सध्या इंदापूरच्या पाण्याचा विषय थांबला असला तरीही मी इंदापूरमधील शेतीच्या पाण्यासाठी थांबलाे नाही. तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीचे व पिण्याचे कायमस्वरुपी पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सुमारे २२ गावांसह इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाण्यासाठी मोठा त्याग केला आहे. पण, आपल्याच तालुक्यातील काहींनी सोलापूरवाल्यांचा विनाकारण गैरसमज केला.

Ajit Pawar-Harshvardhan Patil-Vijay Shivtare-Dattatrey Bharane
आमदार बबनराव शिंदेंचे चिरंजीव अडचणीत; कर्जप्रकरणाच्या फेरचौकशीचे कोर्टाचे आदेश

उजनीचे पाणी इंदापूरला मिळाले, तर आपल्या राजकारणाचे काय होईल, अशी त्यांना भीती वाटली असावी. गैरसमज करणाऱ्यांची शेती पिकली नाही तर त्यांना काहीही फरक पडणार नाही. मात्र, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळाले नाही तर त्यांची पिके जळून नुकसान होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी मी प्रयत्न करीत आहे, असे भरणे यांनी या वेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com