अजितदादांच्या स्टाईलवर मिलिंद नार्वेकर भलतेच खूष; म्हणाले...

पीकविम्याच्या योजनेवरून अजितदादांनी पत्रकारांच्या प्रश्नाला तत्पर आणि चाणाक्षपणे दिलेली उत्तर ऐकणाऱ्या नार्वेकरांनी दादांचा सगळ्याच क्षेत्रात तगडा अभ्यास असल्याचे पत्रकारांनाच सांगितले.
Ajit Pawar-Milind Narvekar
Ajit Pawar-Milind NarvekarSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) हे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावरच आज भलतेच खूष असल्याचे शुक्रवारी विधिमंडळात पाहायला मिळाले. अजितदादांच्या हुशारीचे कौतुक करत, मुख्यमंत्री ठाकरे यांच्या दिमतीला अशाच उपमुख्यमंत्र्यांची गरज असल्याचे नार्वेकर यांनी आपल्या मोजक्या शब्दांतून अधोरेखित केले. (Milind Narvekar lauded Ajit Pawar's cleverness)

पीकविम्याच्या योजनेवरून अजितदादांनी पत्रकारांच्या प्रश्नाला तत्पर आणि चाणाक्षपणे दिलेली उत्तर ऐकणाऱ्या नार्वेकरांनी दादांचा सगळ्याच क्षेत्रात तगडा अभ्यास असल्याचे पत्रकारांनाच सांगितले. त्यापलीकडे जाऊन खरोखरीच ‘दादा खूपच हुशार आहेत’, अशी शाबासकी देऊन पत्रकारांच्या गराड्यात बसलेले नार्वेकर हे पत्रकार परिषदेतील अजित पवारांच्या खुलाशांवर दिलखुलास हसत राहिले.

Ajit Pawar-Milind Narvekar
राज्यातील माता-भगिनींना आधार देणारा अर्थसंकल्प : मुख्यमंत्री ठाकरे

अर्थसंकल्प मांडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. मुख्यमंत्री ठाकरे येणार असल्याने पत्रकारांची गर्दी होती. मुख्यमंत्र्यांसोबत कक्षात आलेल्या नार्वेकरांनी थेट मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर यांच्या खुर्चीचा ताबा घेतला आणि काही मिनिटांसाठी पत्रकारांसारखा रुबाब केला. मुख्यमंत्र्यांचे बोलणे संपताच अजितदादा पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. त्या वेळी पीकविम्याच्या प्रश्नावर त्यांनी मुद्देसूद मांडणी करून पीकविम्याचे गणित उलगडून सांगितले.

Ajit Pawar-Milind Narvekar
अजितदादांनी भाजप आमदार मंदा म्हात्रेंच्या दोन्ही मागण्या केल्या पूर्ण!

अजितदादांनी सोडविलेले हे बिनचूक गणित पाहून नार्वेकर भलतेच खूष झाले आणि शेजारीच असलेल्या एका ज्येष्ठ पत्रकाराला दादांच्या हुशारीचे गमक सांगितले. त्यानंतर आपल्या खुलाशात पत्रकारांपासून विरोधकांना अप्रत्यक्षपणे चिमटे काढण्याच्या अजितदादांच्या ‘स्टाइल’ला नार्वेकरांची दाद मिळत होती. गंमत म्हणजे, अधिवेशनाच्या आदल्या दिवशीच्या चहापानापासून अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतरही माध्यमाशी मोजून बोलणारे मुख्यमंत्री ठाकरे हे अवघड वाटणाऱ्या प्रश्नांना अजितदादांना पुढे करतात. तेव्हा जोरदार बॅटिंग करून अजितदादा हे मुख्यमंत्र्यांना सावरून घेतल्याचे आजपर्यंत दिसले आहे. सरकारवरील संकटाच्या काळातही मुख्यमंत्र्यांना ताकद देणाऱ्या अजितदादांची हीच ‘स्टाईल’ नार्वेकरांना भावत असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com