सरकार कोसळल्यानंतर शरद पवार प्रथमच घेणार महाविकास आघाडीची बैठक

पुढील राजकारणाची रणनीती या बैठक ठरवली जाऊ शकते.
Mahavikas Aghadi's Leader
Mahavikas Aghadi's LeaderSarkarnama

मुंबई : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे प्रथमच आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक घेणार आहेत. मुंबईत येत्या २९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीला पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), काँग्रेसचे विधीमंडळातील नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यासह आघाडीचे महत्वाचे नेते हजेरी लावणार आहेत. त्यामुळे या बैठकीत काय घडते, याकडे राज्याचे लक्ष असणार आहे. (Meeting of Mahavikas Aghadi on September 29 in the presence of Sharad Pawar)

राज्यातील राजकीय परिस्थिती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यावर चर्चा करण्यासाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक घेतली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, पुढील राजकारणाची रणनीती या बैठक ठरवली जाऊ शकते. त्यासाठी महाविकास आघाडीची महत्वाची बैठक येत्या २९ सप्टेंबर रोजी होणार आहे. या बैठकीला ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे नेते उपस्थित राहणार आहेत. याशिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षातील महत्वाचे नेतेही या बैठकीला हजेरी लावणार आहेत.

Mahavikas Aghadi's Leader
बलात्कार करून मुलीचा खून : मृतदेह ४२ दिवसांपासून खड्ड्यात मिठात ठेवला; न्यायासाठी कुटुंबांचा टाहो

दरम्यान, शिवसेनेतील बंडानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. तेव्हापासून महाविकास आघाडीची बैठक शरद पवारांच्या उपस्थितीत झाली नव्हती. या अगोदर मागील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विधानमंडळात बैठक झाली होती. मात्र, आता पवार, ठाकरे आणि काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. त्यामुळे त्याला विशेष महत्व असणार आहे.

Mahavikas Aghadi's Leader
राष्ट्रवादीला दणका : शिर्डी साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त; काळेंना वर्षातच सोडावे लागले पद

दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. राज्यातील जनावरांमध्ये आलेला लंपी आजार, थांबलेला विकासनिधी, विकास कामांना देण्यात आलेली स्थगिती याबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट घेणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com