काडादी-शहा वादात वरिष्ठ नेत्यांची मध्यस्थी : काडादींसमोर ठेवला हा प्रस्ताव; शहा म्हणतात पोलिसांनी...

सिद्धेश्चर कारखान्याची चिमणी आणि सोलापूर विमानतळावरून झालेल्या काडादी आणि शहा यांच्यातील बाचाबाचीची पुढील दिशा दुपारी चारनंतरच स्पष्ट होणार आहे.
Dharmaraj Kadadi-Ketan Shah
Dharmaraj Kadadi-Ketan ShahSarkarnama

सोलापूर : सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे (Siddheshwar Sugar Factory) संचालक धर्मराज काडादी (Dharmraj Kadadi) आणि सोलापूर (Solapur) विकास मंचचे सदस्य केतन शहा (Ketan Shah) यांच्यातील वादात आता शहर-जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी केली आहे. ‘धर्मराज काडादी यांनी दिलगिरी व्यक्त करावी,’ असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. मात्र, काडादी यांनी रविवारी (ता. २७ नोव्हेंबर) दुपारी एकपर्यंत दिलगिरी व्यक्त केली नव्हती. ते दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, ‘पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल करावा,’ अशी विनंती केतन शहा यांनी घेतली आहे. तेही दुपारी चारनंतर आपली पुढील दिशा स्पष्ट करणार आहेत. (Mediation of senior leaders in Dharmaraj Kadadi-Ketan Shah dispute: This proposal was put before Kadadi....)

धर्मराज काडादी यांच्यावर पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल करावा, अशी विनंती पोलिस आयुक्तांना भेटून करणार असल्याचे सोलापूर विकास मंचचे केतन शहा यांनी सांगितले. चेम्बर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षांना घेऊन मी आयुक्तांना भेटणार आहे. चेम्बर ऑफ कॉमर्सच्या सदस्यांसोबत बैठक घेऊनच पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे, असे केतन शहा यांनी सांगितले.

Dharmaraj Kadadi-Ketan Shah
Solapur : धर्मराज काडादींनी भररस्त्यात दाखवले केतन शहांना रिव्हॉल्वर : ‘जास्त शहाणपणा केलास तर गोळ्याच घालतो..’

सिद्धेश्वर साखर कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी हे रविवारी दुपारी चारनंतर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत, त्यामुळे ते दिलगिरी व्यक्त करतात की लढायची भूमिका घेतात, याकडे सोलापूरचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, केतन शहा हे चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षांना भेटणार आहेत. चेंबरच्या सदस्यांची बैठक घेऊन शहा हेही दुपारी चारनंतर पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यानंतरच सिद्धेश्चर कारखान्याची चिमणी आणि सोलापूर विमानतळावरून झालेल्या बाचाबाचीची पुढील दिशा स्पष्ट होणार आहे.

Dharmaraj Kadadi-Ketan Shah
शिवसेनेचे 25 खासदार, 115 आमदार आणि स्वबळावर मुख्यमंत्री ; राऊतांचा स्वबळाचा नारा

शनिवारी सायंकाळी केतन शहा व धर्मराज काडादी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यावेळी काडादींनी रिव्हॉल्वरचा धाक दाखूवन शहा यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या बाचाबाचीनंतर मान्यवरांशी चर्चा करून शहा यांनी शनिवारी रात्री उशिरा सदर बाजार पोलिस ठाणे गाठले होते. पण, सोलापूर शहर-जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली होती. त्यांनी काडादी यांच्यासमोर दिलगिरी व्यक्त करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

Dharmaraj Kadadi-Ketan Shah
Police Recruitment : पोलिस भरतीची वेबसाईट हँग, उमेदवारांना सायबर कॅफेतच रात्र काढण्याची वेळ!

त्या वादाशी आमचा संबंध नाही : विकास मंच

होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करणे, हाच उद्देश आमचा आहे. वादग्रस्त विषयांशी सोलापूर विकास मंचचा काहीही संबंध नाही, असा खुलासा सोलापूर विकास मंचने केला आहे. सोलापूर विकास मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील पूनम गेटसमोर गेल्या एकवीस दिवसांपासून होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू होईपर्यंत चक्री उपोषण सुरू आहे. उपोषणास सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील १७८ हून अधिक प्रतिष्ठित संस्था, संघटना आणि व्यक्तींचा जाहीर पाठिंबा मिळत आहे. आतापर्यंत देश-विदेशातून, प्रत्यक्ष आणि ऑनलाइन पद्धतीने सह्यांच्या मोहिमेस १२,५०० हून अधिक सोलापूरकरांचा प्रतिसाद लाभला असून, सोलापूर विकास मंचच्या वतीने होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करणे हाच आमचा उद्देश आहे. इतर वादग्रस्त विषयांशी सोलापूर विकास मंचचा दुरापास्तही संबंध नसल्याचा खुलासा सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com