ठाकरेंकडे १५-१६च आमदार; संधी मिळाली तर शिवसेना सोडणार का? कायदेंनी स्पष्टच सांगितले

Manisha Kayande News : सरकारनामाच्या 'ओपन माईक' कार्यक्रमात मनीषा कायंदे बोलत होत्या.
Manisha Kayande News
Manisha Kayande NewsSarkarnama

मुंबई : शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर अनेक नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सोडून जात आहेत. त्यामुळे शिवसेना (Shiv Sena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊट गोईंग सुरु आहे. त्या पार्श्वभूमिवर भाजप (BJP) नेते अतुल भातखळकर आणि शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली.

'सरकारनामा ओपन माईक' सिजन 2 या कार्यक्रमात आमदार मनीषा कायंदे बोलत होत्या. या वेळी भाजप आमदार अतुल भातखळकर, काँग्रेस नेते सत्यजित तांबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari), बाळासाहेबांची शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद, मनसे नेते संदीप देशपांडे, शिवसेना (Shivsena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून आमदार मनीषा कायंदे उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात भातखळकर यांनी मनीषा कायंदे यांना प्रश्न विचारला उद्धव ठाकरे यांच्याकडे १५-१६ च आमदार राहिले आहेत. त्यामुळे तुम्हाला भवितव्य धुसर झाले आहे, असे वाटते का? यावर कायंदे यांनीही स्पष्ट उत्तर दिले. मी शिवसेनेत आल्यानंतर मला सहा वर्षानंतर विधान परिषदेवर संधी मिळाली. पहिली संधी उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यामुळे आत्ताची परिस्थिती अस्थिर आहे. त्यामुळे आपल्यापैकी कुणाला काय मिळेल हे सांगता येत नाही, असा चिमटा त्यांनी काढला. त्यामुळे ठाकरे यांना सोडण्याचा प्रश्नच नाही, असे त्यांनी सांगितले.

शिंदे गटात प्रवेश करणार असलेल्या दिपाली सय्यद म्हणाल्या, बाहेरून आलेल्यांनी तुमची जागा घेतली, तर त्रास होतो का? त्यावर कायंदे म्हणाल्या, मी पक्षात आल्यावर माझ्या अगोदरचेही अस्वस्थ झाले असतील. आता कुणी नवीन आले, तर मी असवस्थ व्हावे, असे अजिबात नाही. दुसऱ्याची रेष लहान करण्यापेक्षा आपली रेष मोठी करा, असा सल्ला त्यांनी दिला. राजकारणात मोठा संघर्ष असतोच असे त्यांनी स्पष्ट केले.

Manisha Kayande News
2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतरही शिंदे मुख्यमंत्री असतील का? अतुल भातखळकर म्हणतात...

'सरकारनामा'चा विशेष कार्यक्रम 'ओपन माईक सिजन 2' लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमात नेत्यांनी एक मेकांना चांगल्याच कोपरखळ्या मारल्या. तसेच अडचणीचे प्रश्न विचारुन कोंडीही केली. तर हास्यविनोद करत कार्यक्रमात रंगत आणली. या कार्यक्रमात नेत्यांनीच नेत्यांना प्रश्न विचारले. त्यावर त्यांची धमाल उत्तरे दिली. तसेच एकमेकांना चांगलेच टोमणेही लगावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com